मुंबई : महाराष्ट्रसोबतच देशाच्या अनेक भागात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. पण समाजकंटक गुन्हे किंवा अनाधिकृत धंदे करण्याचा कुठला ना कुठला मार्ग शोधून काढतातच. असाच एक प्रकार समोर आला आहे ज्यात लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या बॉलिवूडच्या एका फोटोग्राफरने अनोख्या पद्धतीने सेक्स रॅकेटचा धंदा सुरु केला होता. पण शेवटी क्राईम ब्रान्चने हा धंदा उद्ध्वस्त करत त्याला अटक केली.
नासिर खान असं सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपीचं खरं नाव आहे. परंतु रॅकेट चालवण्यासाठी तो करण ठाकूर हे नाव वापरायचा. खरंतर हा बॉलिवूडमध्ये फोटोग्राफर होता. पण लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने त्याने ऑनलाईन पद्धतीने धंदा सुरु केला. त्याने आपली एक टोळीच तयार केली होती.
काय होती मोडस ऑपरेंडी?
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांना बाहेर जाता येत नाही. आवश्यक असेल तर शासनाची किंवा पोलिसांची परवानगी घेऊन बाहेर जाता येतं. म्हणून आरोपीने अनोख्या पद्धतीने ऑनलाईन सेक्सचा धंदा सुरु केला. यामध्ये ग्राहक आणि तरुणी दोघेही ऑनलाईन पद्धतीने एकमेकांशी संपर्क साधत ‘परफॉर्म’ करत असल्याची माहिती समोर आली.
प्रमुख आरोपीने एक टोळीच तयार केली होती. www.massagerepublic.com, www.adultfriendfinder.com, www.eurogrillsescort.com या वेबसाईटवर तरुणींचे फोटो आणि मोबाईल नंबर अपलोड केले जात होते. जर कोणी संपर्क साधला तर सर्वकाही ‘फिक्स’ झाल्यानंतर पैसे ऑनलाईन घेतले जात होते.
यापूर्वी गुन्हे शाखेने संबंधित ऑनलाईन सेक्स रॅकेटवर कारवाई केली होती. टोळीच्या सहा आरोपींना अटक करुन जवळपास 11 तरुणींची सुटका करण्यात आली होती. मात्र पूर्वी केलेल्या कारवाईदरम्यान मुख्य आरोपी कर्नाटकला निघून गेला होता. तो मुंबईत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी पाळत ठेवली आणि मुख्य आरोपीला अंधेरी परिसरातून अटक करण्यात आली.
मुख्य आरोपीला जेव्हा अटक केली त्यावेळी त्याच्यासोबत तीन तरुणी होत्या, त्यांची सुटका करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये इतर कोणी आहे का याचाही शोध गुन्हे शाखेचे अधिकारी घेत आहेत.
लॉकडाऊनमध्ये अनेकांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग बदला तर गुन्हेगारांनी त्यांचा गुन्हा करण्याची पद्धत बदलली. या लोकांनी कोणाची फसवणूक केली आहे का? कोणाला ब्लॅकमेल केलं आहे का? याचा तपास आता क्राईम ब्रान्चकडून केला जात आहे.