तेल्हारा(प्रतिनिधी)- सेठ बन्सीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या शैक्षणिक सत्र सन २०२० – २१ महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करीत सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. बेनीप्रसादजी झुनझुनवाला व समस्त व्यवस्थापक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्राचार्य श्री.राजेंद्रकुमार केशवराव देशमुख यांनी ऑनलाईन वार्षिक निकाल जाहीर केला RTE ACT च्या नियमानुसार मुख्याध्यापकांना मिळालेल्या अधिकारांतर्गत वर्ग ५ वी ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात बढती देण्यात आली त्याचप्रमाणे वर्ग 9 व वर्ग ११ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत मूल्यमापना द्वारे पुढील वर्गात बढती देण्यात आली सर्व विद्यार्थ्यांचे माननीय श्री.बेनीप्रसादजी झुनझुनवाला अध्यक्ष सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी व समस्त व्यवस्थापक मंडळ व प्राचार्य श्री राजेंद्रकुमार देशमुख यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक सत्र २०२१ – २२ बाबतच्या महत्त्वाच्या सूचना श्री.राजेंद्रकुमार देशमुख प्राचार्य यांनी दिल्या दिनांक २८/०६/२०२१ पासून नवीन शैक्षणिक सत्राच्या सुरुवात होईल.
ऑनलाइन झूम मीटिंगमध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री.बेनीप्रसादजी झुनझुनवाला , उपाध्यक्ष श्री.विलासराव जोशी व्यवस्थापक श्री गोपालदासजी मल्ल कोषाध्यक्ष श्री विठ्ठलराव खारोडे संचालक श्री.राजेंद्रकुमार शहा , अश्विनीताई खारोडे श्री.डॉ. विक्रम जोशी श्री.विष्णू मल्ल श्री.पुष्कर तागडे श्री.शिवम पाडिया श्री.अभिजीत शहा व सर्व समस्त शिक्षक वृंद बहुसंख्येने विद्यार्थी सहभागी झाले ऑनलाईन सभेचे संचलन श्री मुकुंद सोनीकर यांनी केले ऑनलाइन मिटिंग चे व्यवस्थापन श्री.सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.शुभम टीकार श्री.शशिकांत पदवाड यांनी यशस्वीरित्या केली.