• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Akola Corona Cases: 489 पॉझिटीव्ह, सहा मृत्यू ,403 डिस्चार्ज

Team by Team
May 5, 2021
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
84 2
0
corona covid 19
36
SHARES
616
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– दि.5 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2585 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2096  अहवाल निगेटीव्ह तर 489 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 403  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.4) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 205 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 43121(33068+9876+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 489  व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 205 असे एकूण पॉझिटीव्ह 694 आहेत.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 215946 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 213033 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2526 नमुने होते. आजपर्यंत एकूण 215798 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 182730   आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

489 पॉझिटिव्ह

दि.5 दिवसभरात ४८९ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८४ महिला व ३०५ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-३८, अकोट-७४, बाळापूर-३४, तेल्हारा-चार, बार्शी टाकळी-१३, पातूर-८७, अकोला-२३९. (अकोला ग्रामीण-७५, अकोला मनपा क्षेत्र-१६४)

दरम्यान काल (दि.4) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 205 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

सहा जणांचा मृत्यू

आज दिवसभरात सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात बाळापूर येथील ७० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. ३ मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य गोरक्षण रोड येथील ७९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २७ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, खोलेश्वर येथील ७० वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते. अकोला फैल  येथील ६२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ४ मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर  देऊळगाव ता. पातूर येथील ६४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.३० एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

  403 जणांना डिस्चार्ज

दरम्यान दि.5 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २२, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, नवजीवन हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक,  कोविड केअर सेंटर अकोट येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी दोन, केअर हॉस्पीटल येथील एक,युनिक हॉस्पीटल येथील एक, आगर हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा कर्मचारी भवन येथील एक, समाज कल्याण वसतीगृह येथील सहा, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, तर होम आयसोलेशन मधील ३४५ असे एकूण ४०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5977 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 43121(33068+9876+177) आहे. त्यात 743 मृत झाले आहेत. तर 36401 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5977 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola newsAkola news in Marathicorona cases akolacorona update akola
Previous Post

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे अनावरण

Next Post

कोरोनामुळं नुकसान झाल्याचं Blood Test मधून कसं कळतं? कोणत्या टेस्ट करायच्या …

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
covid test

कोरोनामुळं नुकसान झाल्याचं Blood Test मधून कसं कळतं? कोणत्या टेस्ट करायच्या ...

KBC

प्रेक्षकांच्या भेटीला येतंय ‘कौन बनेगा करोडपती’चं 13वं पर्व, तुम्ही देखील होऊ शकता सहभागी!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.