• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अमरावती : बांधकाम स्थळावरील रेतीच्या वादात मध्यस्थी करणे तरुणाच्या जिवावर बेतले; लाकडी रॉप्टरने हल्ला करून निर्घृण हत्या

Team by Team
May 1, 2021
in Featured, Amravati, गुन्हा
Reading Time: 1 min read
85 0
0
crime news
28
SHARES
610
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती :  बांधकाम स्थळावरील रेतीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या भीमराव तायडे (वय २० रा. चवरेनगर) याची लाकडी रॉप्टरने हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली. संचारबंदी असताना राजापेठ हद्दीतील न्यू विजय नगरात घडलेल्या या घटनेमुळे गुरुवारी रात्री खळबळ उडाली. आठवड्याभरातील ही दुसरी खुनाची घटना असून राजापेठ हद्दीत घडली आहे.

याप्रकरणी आकाश रुपचंद गेडाम (वय २१ रा. चवरेनगर) राजापेठ पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक अशोक तुरुक (रा. स्वागतम कॉलनी), संकेत सुरेश घुगे (रा. आदर्शनगर) आणि शिवम शरद कुकडे (रा. फॉरेस्ट कॉलनी, साईनगर) या तिघांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयाने ७ मेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आकाश रुपचंद गेडाम याची बहीण अश्विनी सुनील कटकतलवारे ही न्यू विजय नगरातील हरिहर रामराव बोचरे यांच्याकडे गेल्या एक वर्षांपासून भाड्याने राहते. गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आकाशचे दाजी सुनील यांनी फोनकरून घरासमोर काही तरुण शिवीगाळ व दगडफेक करत असल्याचे सांगितले. ते ओळखीचे असल्यामुळे लग्न समारंभात असलेला आकाश हा त्याचे मित्र श्रेयस गडेकर, संकेत ऊर्फ गोलु नारळे व वैभव तायडे यांना घेऊन न्यू विजय नगरात पोहोचला. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करणाऱ्या दीपक तुरुकला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी बांधकामस्थळावरील रॉप्टरने हल्ला केल्याने वैभव तायडे जागीच ठार झाल्याचे गेडामने याने तक्रारीत म्हटले आहे.

अधिक वाचा : मलकापुरातील कोविड सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू,नातेवाईकांचा आरोप

न्यू विजय नगरातील रहिवासी हरिहर बोचरे हे पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या घराचे बांधकाम स्लॅबपर्यंत आले आहे. तर त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या नाकोसे यांच्याकडेही एका खोलीचे बांधकाम सुरु असून, ते कंत्राटदार दीपक तुरुक करत आहेत. त्याने नाकोसे यांच्या घरासमोर एक ट्रक रेती आणून टाकली होती. त्यातील काही रेती बोचरे यांच्या घरापर्यंत पसरली होती. ती रेती उचलून घेण्याचे बोचरे यांनी नाकोसेकडील सुपर वायझरला सांगितले होते. परंतु ती रेती वेळवर न उचल्यामुळे बोचरे यांनी त्यांच्याकडील बांधकामाचे साहित्य नाकोसेकडील रेतीवर टाकले. हा प्रकार समजताच कंत्राटदार  तुरुकने २९ एप्रिल रोजी दुपारी बोचरे यांना जाब विचारून शिवीगाळ केली. त्यानंतर रात्रीच्या वेळेत दीपक तुरुक हा काही साथीदारांना घेऊन बोचरे यांच्या घरासमोर पोहोचला. त्याने बोचरे यांना शिवीगाळ करून त्यांच्या घरावर दगडफेक केली. हा प्रकार पाहून बोचरे यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या सुनील कटकतलवारे यांनी ही माहिती त्यांचा मेहुणा आकाश गेडामला दिली. त्यानंतर तो मित्रांसह तेथे आला. त्याच्यासोबत वैभवही होता. यावेळी झालेल्या वादावादीत त्याचा खून झाला.

घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलीसांनी रक्तबंबाळ अवस्थेत पडून असलेल्या तायडेला इर्विन रुग्णालयात नेले. परंतु त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेच्या माहितीवरून पोलिस उपायुक्त शशिकांत सातव, राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे करत आहेत.

Tags: amravati crime newscrime news
Previous Post

मलकापुरातील कोविड सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू,नातेवाईकांचा आरोप

Next Post

पतीला सोडलं प्रियकराचा हाथ धरला, भांडणानंतर पुन्हा घराची वाट, नंतर प्रियकराने जे केलं ते धक्कादायक !

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
पतीला सोडलं प्रियकराचा हाथ धरला, भांडणानंतर पुन्हा घराची वाट, नंतर प्रियकराने जे केलं ते धक्कादायक !

पतीला सोडलं प्रियकराचा हाथ धरला, भांडणानंतर पुन्हा घराची वाट, नंतर प्रियकराने जे केलं ते धक्कादायक !

अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने मास्कबाबत दिली एक नवी माहिती

‘आपला मास्क विचारपूर्वक निवडा’; कापडाचा मास्क व्हायरसपासून संरक्षण देत नाही!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.