• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मलकापुरातील कोविड सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू,नातेवाईकांचा आरोप

Team by Team
May 1, 2021
in Featured, Buldhana, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
वॉशरूममधून परतलेल्या रुग्णाला बेड मिळाला नाही, म्हणून शेजारच्या रुग्णाला जमिनीवर आपटले; जागीच मृत्यू
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

बुलढाणा : बुलढाण्यातील मलकापूर उपजिल्हा रुग्णालाय आणि कोविड सेंटरमधील वीजपुरवठा तब्बल दीड तास खंडित झाल्याने, रुग्णालयात भरती असलेल्या 25 रुग्णांचे प्राण टांगणीला लागले होते. त्यातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर वर असलेल्या एका कोविड रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले. हा धक्कादायक प्रकार तब्बल दीड तास सुरु असल्याने कोविड सेंटरमधून रुग्ण बाहेर आले होते. रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णाला जीव गमवावा लागल्याचं म्हटलं जात आहे.

रुग्णालयाचा विद्युत पुरवठा काल (30 एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास खंडित झाल्याने कोविड सेंटरमधील रुग्ण अक्षरशः बाहेर आले. तर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या दोन रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. त्यातील 35 वर्षीय प्रेमसिंग राजपूत नावाच्या रुग्णाला आपला प्राण गमवावा लागला. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी आपले रुग्ण दुसरीकडे हलवण्याची तयारी केली. पण नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी रुग्णाच्या नातेवाईंकांना धीर देत वीज येईपर्यंत थांबवलं.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वीजपुरवठा खंडित झाला त्यावेळी रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. नाफडे हे कामानिमित्त अकोला इथे गेले असल्याची माहिती मिळाली. यानंतर एबीपी माझाने थेट रुग्णालय गाठून तिथल्या परिस्थितिचा अढावा घेतला असता रात्री 10.45 वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आल्याचं समजलं. रुग्णालयाच्या कोविड रुग्ण विलगीकरण कक्षाला भेट दिली असता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कोविड रुग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी नेमून दिलेला सिक्युरिटी गार्ड झोपलेला होता तर कोविड पॉझिटिव्ह प्रत्येक रुग्णाचे एक-दोन नातेवाईक या रुग्णाच्याच बेड खाली झोपले होते. हा प्रकार एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबद्दल तिथे हजर असलेल्या डॉक्टरांना विचारणा केली असता, हा जणू नित्याचा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं. तात्काळ तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना फोनवरुन याबाबत माहिती देण्यासाठी कॉल केला असता, त्यांचा फोन स्विच ऑफ असल्याचं समजलं. तर रुग्णालयात एकही वरिष्ठ डॉक्टर हजर नसल्याचं अनेक रुग्ण सांगत होते. इतकंच नाही तर रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाला पाणी देण्यासाठीही कोणी कर्मचारी नसल्यामुळे, आम्हाला नातेवाईकांना विलगीकरण कक्षात येण्याचं इथले डॉक्टरच सांगतात, असं नातेवाईकांनी सांगितलं.

दरम्यान रुग्णालयातील जनरेटर अशा महामारीच्या काळात देखील गेल्या तीन ते चार महिन्यापासून ना दुरुस्त असल्याने व्हेंटिलेटरवरील एका रुग्णाला जीव गमवावा लागला. पण याची जबाबदारी घेण्यास कोणाची हा प्रश्नच आहे. तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांचा फोन स्विच ऑफ होता. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नाफडे हे आपल्या वैयक्तिक कामानिमित्त अकोला इथे गेले होते ते रात्री तीन वाजेपर्यंत देखील आले नव्हते. यावरुन प्रशासन कोरोना रुग्णाप्रति आणि कोरोना प्रतिबंधासाठी किती संवेदनशील आहे हे समोर येत आहे.

Tags: Covid care center accidentcovid care center buldhana
Previous Post

अकोला : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध 15 मेपर्यंत कायम

Next Post

अमरावती : बांधकाम स्थळावरील रेतीच्या वादात मध्यस्थी करणे तरुणाच्या जिवावर बेतले; लाकडी रॉप्टरने हल्ला करून निर्घृण हत्या

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
crime news

अमरावती : बांधकाम स्थळावरील रेतीच्या वादात मध्यस्थी करणे तरुणाच्या जिवावर बेतले; लाकडी रॉप्टरने हल्ला करून निर्घृण हत्या

पतीला सोडलं प्रियकराचा हाथ धरला, भांडणानंतर पुन्हा घराची वाट, नंतर प्रियकराने जे केलं ते धक्कादायक !

पतीला सोडलं प्रियकराचा हाथ धरला, भांडणानंतर पुन्हा घराची वाट, नंतर प्रियकराने जे केलं ते धक्कादायक !

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.