अकोट (शिवा मगर) -टाकळी खुर्द येथे गेले 4 दिवसात 50 च्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असून कालही घेण्यात आलेल्या 140 चाचणीमध्ये 36 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून गेल्या 4 दिवसात दोघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे
अकोट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कावसां अंतर्गत येणाऱ्या टाकळी खुर्द येथे गेले 4 दिवसात 50 च्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असून 4 दिवसात या गावात 50 च्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह निघाले त्यापैकी 2 रुग्णाचा मृत्यू झाले असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे . स्थानिक प्रशासनाने सर्व नागरिकांच्या चाचणी करून घेऊन पॉझिटिव्ह रुग्णांना क्वारनटाईन करण्याकरिता पाठवण्यात आले.यावेळी अकोट पंचायत समिती गटविकास अधिकारी शिंदे.विस्तार अधिकारी नागे, प्राथमिक आरोग्य केंद्र कावसा वैद्यकीय अधिकारी डाबेराव आणि अकोट पंचायत समिती आरोग्य पथक यांनी गावाला भेट देऊन गाव कन्टेनमेंत झोन घोषित करण्याकरिता प्रस्ताव सादर केला.गावातील नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता औषध गोळ्या,मास्क वापरणे,सॅनिटायझर वापर आणि सोशल डिस्टनगसिंगचे पालन करण्याचे आवाहन केले असून या वाढलेल्या पूर्ण गाव सिल करण्यात आले.