• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

अकोल्यात १० जणांचा मृत्यू ; 389 पॉझिटीव्ह

City Reporter by City Reporter
April 25, 2021
in Corona Featured, Featured
Reading Time: 1 min read
83 1
0
akola-corona-13-quarantine
42
SHARES
597
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.25- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2228 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1839 अहवाल निगेटीव्ह तर 389 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 775 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर दहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 80 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 37672(29388+8107+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 389 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 80 असे एकूण पॉझिटीव्ह 469 आहेत.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 196789 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 193952 फेरतपासणीचे 385 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2452 नमुने होते. आजपर्यंत एकूण 196728 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 167340 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : ऑक्सिजनची पातळी कमी होतेय? घाबरु नका; करा ‘हा’ उपाय

389 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ३८९ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५६ महिला व २३३ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-३६, अकोट-४३, बाळापूर-आठ, बार्शी टाकळी- २५, पातूर-११, अकोला-२६६. (अकोला ग्रामीण-३४, अकोला मनपा क्षेत्र-२३२)

दरम्यान काल (दि. 24) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 80 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

दहा जणांचा मृत्यू

आज दिवसभरात १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात चैतन्य नगर, सिव्हील लाईन येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य शिवाजी नगर येथील ५८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते, बार्शीटाकळी येथील ५९ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील ८२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, तसेच वरखेड ता.बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिला असून या महिलेस दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, दहिहांडा ता.अकोट येथील ६३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते. तर टाकळी बु.ता. अकोट येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते. तर पातूर येथील ८० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. अन्वी मिर्झापूर येथील ४० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, ७० वर्षीय अज्ञात पुरुष रुग्णास दि. २४ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

हेही वाचा : संकटाच्या काळातही अकोल्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार; स्थानिक गुन्हे शाखेने टोळी केली गजाआड

775 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील आठ, देवसार हॉस्पीटल येथील एक, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील आठ, मुलांचे वसतीगृह येथील ११, खैर उम्मत हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील एक, जिल्हा रुग्णालय अकोला येथील १६, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील आठ, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन हारमोनी हॉस्पीटल येथील दोन, ठाकरे हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेंट येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ६६० असे एकूण ७७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5997 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 37672(29388+8107+177) आहे. त्यात 629 मृत झाले आहेत. तर 31046 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5997 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: corona update akola
Previous Post

ऑक्सिजनची पातळी कमी होतेय? घाबरु नका; करा ‘हा’ उपाय

Next Post

ऊर्जा राज्यमंत्री ना. तनपुरे यांनी केली पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
ऊर्जा राज्यमंत्री ना. तनपुरे यांनी केली पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी

ऊर्जा राज्यमंत्री ना. तनपुरे यांनी केली पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.