नवी दिल्ली : कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने पाच शहरांत लॉकडाऊन लागू करण्याचे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. तर या आदेशाची अंमलबजावणी करण्यास योगी आदित्यनाथ सरकारने नकार दिला होता. याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे उत्तर प्रदेश सरकारने ठरविले आहे.
देशातील इतर शहरांबरोबरच उत्तर प्रदेशातील अनेक शहरात कोरोना संकट गडद बनले आहे. या पार्श्वभूमीवर लखनौ, प्रयागराज, वाराणसी, कानपूर आणि गोरखपूर या शहरांत सोमवारी रात्रीपासून २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, योगी सरकारने हे आदेश लागू करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम होईल. जनतेच्या जीवनाचे आणि उपजीविकेचे संरक्षण करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावर अंमलबजावणी होऊ शकत नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती.
हे पण वाचा : Covid19 : सध्याच्या नियमांप्रमाणेच किराणा दुकाने सुरु राहणार, पालिका आयुक्तांकडून स्पष्टीकरण
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाय योजण्यात आले आहेत. आयुष्य वाचवण्यासोबत गरिबांच्या उपजीविकेचेही संरक्षण करायचे आहे. त्यामुळे शहरात संपूर्ण लॉकडाऊन लावता येणार नाही, असा युक्तिवाद आता योगी सरकार सर्वोच्च न्यायालयात करणार आहे.