अकोला,दि.१८ – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २१९३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७९७ अहवाल निगेटीव्ह तर ३९६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान २७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.त्याच प्रमाणे काल (दि.१७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १९२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३३८६३(२६६०५+७०८१+१७७)झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (सकाळ)३०३+आरटीपीसीआर (सायंकाळ)९३+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १९२= एकूण पॉझिटीव्ह-५८८ आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १८२८२१ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १८००९७ फेरतपासणीचे ३८३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २३४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण १८२६७२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १५६०६७ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
३९६ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ३९६ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी ३०३ जणांचे तर सायंकाळी ९३ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३८ महिला व २५८ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-२९, अकोट-६५, बाळापूर-१९, तेल्हारा-२४, बार्शी टाकळी-पाच, पातूर-२०, अकोला-२३४. (अकोला ग्रामीण-३२, अकोला मनपा क्षेत्र-२०२.) दरम्यान काल (दि.१७) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात १९२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
पाच जणांचा मृत्यू
आज सकाळी पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात वरखेड ता. बार्शी टाकळी येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१२ रोजी दाखल करण्यात आले होते. सेलगाव ता. पातूर येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१४ रोजी दाखल करण्यात आले होते. आंबोडा ता. अकोट येथील ८० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१४ रोजी दाखल करण्यात आले होते. मलकापूर येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१६ रोजी दाखल करण्यात आले होते. देहगाव ता.बाळापूर येथील ७२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१५ रोजी दाखल करण्यात आले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
२७६ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५१, आरकेटी कॉलेज येथून तीन नवजीवन हॉस्पिटल येथून एक, अकोट कोविड केअर सेंटर येथून चार, युनिक हॉस्पिटल येथून तीन, अवघाते हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून अएक, यकिन हॉस्पिटल येथून एक , समित्र हॉस्पिटल येथून एक, जिल्ह स्त्री रुग्णालयातून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, बिहाडे हॉस्पिटल येथून आठ , अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून चार तर होम आयसोलेशन मधील १८८ असे एकूण २७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
४६१६ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ३३८६३(२६६०५+७०८१+१७७) आहे. त्यात ५६० मृत झाले आहेत. तर २८६८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४६१६ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.