• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

CSK vs PBKS T20 : चेन्नई सुपर किंग्सच्या विजयानंतर महेंद्रसिंग धोनी म्हणाला, मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय!

Media Desk by Media Desk
April 17, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
80 3
0
CSK vs PBKS T20
13
SHARES
594
VIEWS
FBWhatsappTelegram

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) शुक्रवारी आयपीएल २०२१मधील पहिल्या विजयाची नोंद केली. पंजाब किंग्सविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईनं ६ विकेट्स व २६ चेंडू राखून विजय मिळवला आणि गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली. दीपक चहरनं ( ४-१३) सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना पंजाब किंग्सला ८ बाद १०६ धावांपर्यंत समाधान मानण्यास भाग पाडले. शाहरुख खाननं ( ४७) एकाकी झुंज दिली. चेन्नईनं हे लक्ष्य ६ विकेट्स व २६ चेंडू राखून सहज पार केले. महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) हा चेन्नई सुपर किंग्सकडून २०० वा सामना होता आणि विराट कोहलीनंतर ( RCB) एकाच फ्रँचायझीकडून दोनशे सामने खेळणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. या सामन्यानंतर धोनी म्हणाला, मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय.. महेंद्रसिंग धोनीनं केली विराट कोहलीला मदत; CSKच्या विजयानं RCBच्या नावे विक्रम

महेंद्रसिंग धोनी म्हणाला,”मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय. हा खूप लांबचा प्रवास होता. २००८मध्ये दक्षिण आफ्रिकेतून या प्रवासाला सुरुवात झाली, त्यानंतर दुबई व घरच्या मैदानावर खेळतोय. यंदाच्या पर्वात मुंबईत घरचे सामने खेळावे लागतील, असा विचार केला नव्हता. येथील खेळपट्टी चांगली होती, परंतु त्याची नजाकत त्या दिवसाच्या हवामानावरही अवलंबून असते. चेंडू जास्त स्वींग होत नव्हता. दीपक चहरनं आज ज्या प्रकारे कामगिरी केली, मग त्याच्याकडून सुरुवातीलाच चार षटकं फेकून घेण्यात काहीच हरकत नव्हती. ड्वेन ब्राव्हो डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतो.”

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

”मोईल अलीला वरच्या क्रमांकावर फलंदाजी पाठवावे असे मला वाटले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पर्यायाचा वापर आम्ही केला, असेही धोनी म्हणाला.

  • CSK vs PBKS  सामन्याचे हायलाईट्स

दीपक चहरनं ४ षटकांत १३ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि त्यात १ निर्धाव षटकही टाकलं. २६ धावांवर पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर पंजाब किंग्ससाठी झाय रिचर्डसन व शाहरुख खान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३१ धावा जोडल्या. पण, मोईन अलीनं त्याच्या पहिल्याच षटकात रिचर्डसनचा ( १५) त्रिफळा उडवला. शाहरुख अखेरपर्यंत खिंड लढवत राहिला. त्यानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा केल्या. पंजाबला २० षटकांत ८ बाद १०६ धावांवर समाधान मानावे लागले.

प्रत्युत्तरात मोईन अली व फॅफ ड्यु प्लेसिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. फॅफ व अलीनं काही नेत्रदिपक स्ट्रोक खेळले. मोईन ३१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४६ धावांवर माघारी परतला. सुरेश रैना व अंबाती रायुडू झटपट बाद झाले, परंतु त्याचा सामन्याच्या निकालावर काहीच परिणाम झाला नाही. चेन्नईनं१५.४ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात हा सामना जिंकला. फॅफ ३३ चेंडूंत ३६ धावांवर नाबाद राहिला.

Tags: IPL 2021MS Dhoni
Previous Post

महिला ST कंडक्टरची हत्या प्रेमप्रकरणातून; आरोपी कंडक्टर अटक

Next Post

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत असे होईल उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोला : तालुकास्तरावर मोटार वाहन नोंदणी, तपासणी व अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत असे होईल उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज

अकोला : कौशल्य विकास विभागातर्फे ऑनलाईन रोजगार मेळावा चार कंपनी होणार सहभागी

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा: सोमवार दि.१९ पासून ऑनलाईन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.