• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कार्यक्रम: जिल्हा स्त्री रुग्णालयास राष्ट्रीय लक्ष्य मानांकन प्लॅटिनम ॲवार्ड

Team by Team
April 16, 2021
in अकोला, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
77 1
0
राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कार्यक्रम: जिल्हा स्त्री रुग्णालयास राष्ट्रीय लक्ष्य मानांकन प्लॅटिनम ॲवार्ड
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – केंद्र शासनाच्या चमूने पाहणी करुन जिल्हा स्त्री रुग्णालयाला राष्ट्रीय लक्ष्य मानांकनाचे प्लॅटिनम ॲवार्ड मिळाले आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असून जिल्हा स्त्री रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे अभिनंदनास पात्र आहेत,असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज काढले. रुग्णांचा विश्वास संपादन करणे हाच खरा लौकीक असून या विश्वासाची जपणूक करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,असे प्रतिपादनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी केले.

जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रसुती कक्ष व शल्य गृह कक्ष यांची सन २०१९-२० मध्ये केंद्राच्या पथकाने पाहणी केली होती. त्यानंतर त्यास राष्ट्रीय लक्ष्य मानांकन प्लॅटीनम ॲवार्ड प्राप्त झाले आहे. या पुरस्कारात जिल्हा स्त्री रुग्णालयास सहा लक्ष रुपयांची रक्कम मिळाली आहे. या यशात सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनाचे (दि.११ एप्रिल) औचित्य साधुन गौरविण्यात आले. जिल्हा स्त्री रुग्णालयातील कस्तुरबा सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, रुग्ण कल्याण समितीचे पराग गवई, स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

प्रसुती कक्षातील गरोदर माता व नवजात शिशुच्या हृदयाचे ठोके तसेच गर्भाशयाच्या आकुंचन प्रसारणाची माहिती देणारे राष्ट्रीय दक्ष ॲप, स्त्री रुग्णालयाने तयार केलेल्या ऑनस्पॉट माहिती देणारे समता ॲपचे विमोचन ही जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा स्त्री रुग्णालयच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वंदना वसो, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. विजया पवनीकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना फडके, प्रशासकीय अधिकारी डॉ. राधा जोगी, अधिपरिचारिका सीमा बेंद्रे, औषधी निर्माण अधिकारी गणेश भडांगे, आहार तज्ज्ञ अंजली वाघ, मुकादम हरिश पवार, शिवचंद जयपिल्ले, हृषिकेश नाचणकर व अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सम्नान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व अन्य मान्यवरांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या टिमचे कौतूक केले. सूत्रसंचालन डॉ. मेघना बगडीया यांनी केले. प्रास्ताविक डॉ. आरती कुलवाल यांनी तर आभार प्रदर्शन सीमा बेंद्रे यांनी केले.

Tags: National Safe Motherhood Day ProgramNational Target Rating Platinum Award for District Women's Hospital akola
Previous Post

आता कोविड लस घेणाऱ्या ग्राहकांच्या ठेवीवर जादा व्याजदर

Next Post

२ वर्षे अनैतिक संबंधांनंतर प्रियकराला देत होती त्रास, माथेफिरू रोमिओने प्रेयसी अन् तिच्या मैत्रिणीची केली हत्या!

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
crime news

२ वर्षे अनैतिक संबंधांनंतर प्रियकराला देत होती त्रास, माथेफिरू रोमिओने प्रेयसी अन् तिच्या मैत्रिणीची केली हत्या!

watermelon kharra yavatmal news

कोविड रुग्णांना टरबुजातून खर्रा; कोरोनाग्रस्तांची तल्लफ भागवण्यासाठी नातेवाईकांची शक्कल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.