• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

फांदी मोडली, कौमार्य चाचणीत नापास झाल्याने नववधूला दिला घटस्फोट

Our Media by Our Media
April 15, 2021
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
81 0
0
फांदी मोडली, कौमार्य चाचणीत नापास झाल्याने नववधूला दिला घटस्फोट
13
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

कोल्हापूर : समाजात आजही कूप्रथा चालवल्या जात आहेत. त्यातील एक म्हणजे कौमार्य चाचणी. बेलगावमध्ये कौमार्य चाचणीत नापास झाल्याने दोन तरुणींचे झालेले लग्न मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरमधील दोन तरुणींचा विवाह बेळगावमधील दोन सख्ख्या भावांशी झाला होता. विवाह थाटामाटात झाला. परंतू लग्नाच्या पहिल्याच रात्री या दोन्ही तरुणींची कौमार्य चाचणी (virginity test)  केल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर या चाचणीत एक तरुणी नापास झाल्याचा दावा करुन झाडाची फांदी मोडून, जात-पंचायत भरवून जात पंचायतीने हा विवाह मोडीत काढला. या प्रकारामुळे कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागातील लोकांकडून संताप व्यक्त होत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

कोल्हापुरातील एका धुणी भांडी करत घर सांभाळणाऱ्या एका महिलेने अंनिसकडे (अंधश्रद्धा निर्मूलन समिती ) तक्रार केली. तक्रारीनंतर या समाजात जात पंचायतीच्या नावाने सुरू असलेल्या अन्यायाला वाचा फुटली. पतीच्या निधनानंतर तिने मोठ्या कष्टाने दोन मुलींना वाढवत त्यांना शिक्षण दिलं. २७ नोव्हेंबर २०२० रोजी दोन्ही मुलींची एकाच मांडवात लग्न झाली. दोन्ही मुली एकाच घरात दिल्या. बेळगाव येथे थाटामाटात लग्न झालं. जेवणाचे निमित्त करून दोघींना एका पाहुण्यांच्या घरी नेले आणि त्यांची कौमार्य चाचणी करण्यात आली. या चाचणीत एक मुलगी नापास झाल्याचा आरोप करत त्या दिवसापासून छळ केला जात होता. ‘तु आत्महत्या कर, नाही तर माहेरी निघून जा’ म्हणून तगादा सुरू झाला.

अधिक वाचा : संतापजनक! कोरोना बाधित महिलेसोबत छेडछाड; मेडिकल कोऑर्डिनेटला अटक

दोन बहिणींपैकी त्या मुलीचा नवरा हा सैन्यात आहे. मला तीन खून माफ आहेत, तू आत्महत्या कर नाही तर मीच तुला गोळ्या घालीन…अशी धमकी हा सैनिक पती तिला देत होता. सासूदेखील या छळात सहभागी. पाच दिवसानंतर दोघींना माहेरी पाठवले. नंतर मात्र त्यांनी त्यांना सासरी येण्यास मज्जाव केला. याचा न्याय निवाडा करण्यासाठी जात पंचायत बसली. सासू काही नातेवाईकांना घेऊन तेथे पोहोचली. जात पंचायतीने कौमार्य चाचणीत नापास झाल्याचा ठपका ठेवत काडीमोड घेण्याचा प्रस्ताव पुढे आणला. डमी नवरा उभा करून त्याने बाबळीची काडी मोडली. घटस्फोट दिला.

हा सगळा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणींना आणि त्यांच्या आईला विश्वासात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोन्ही नवरदेवांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे यापैकी एक नवरदेव हा भारतीय सैन्य दलात असून, त्याने आपल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Tags: virginity test fail case
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – राज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा

Next Post

संतापजनक! कोरोना बाधित महिलेसोबत छेडछाड; मेडिकल कोऑर्डिनेटला अटक

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Rape

संतापजनक! कोरोना बाधित महिलेसोबत छेडछाड; मेडिकल कोऑर्डिनेटला अटक

चाचणी

देशात कोरोनाचा मोठा उद्रेक! २४ तासांत २ लाखांवर नवे रुग्ण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.