• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 6, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेऱ्यासह Tecno Spark 7 लाँच; जाणून घ्या किंमत अन् स्पेसिफिकेशन्स

Team by Team
April 13, 2021
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
81 2
0
Tecno-Spark-7
13
SHARES
594
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्‍ली – टेक्‍नो या जागतिक प्रिमिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने आज त्‍यांच्‍या स्‍पार्क सिरीजमधील आणखी एक सेगमेंट-फर्स्‍ट वैशिष्‍ट्यांनी युक्‍त फ्यूचर-रेडी डिवाईस स्‍पार्क ७ (Tecno Spark 7) च्‍या लाँचची घोषणा केली आहे. या नवीन स्‍मार्टफोनसह टेक्‍नोने भारतातील ५ हजार – १० हजार स्‍मार्टफोन विभागातील अव्‍वल ५ हँडसेट कंपन्‍यांमधील त्‍यांचे स्‍थान अधिक प्रबळ करण्‍याचे कार्य सुरूच ठेवले आहे. स्‍पार्क ७ स्‍मार्टफोन २ जीबी + ३२ जीबी व्हेरिएंटसाठी ६,९९९ रूपये आणि ३ जीबी + ६४ जीबी व्‍हेरिएंटसाठी ७,९९९ रूपये या सुरुवातीच्या विशेष ऑफर किंमतीसह उपलब्‍ध आहे. १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून स्‍प्रूस ग्रीन, मॅग्‍नेट ब्‍लॅक आणि मॉर्फअस ब्‍ल्‍यू या ३ आकर्षक रंगांमध्‍ये एमेझॉनवर उत्पादनाची विक्री सुरू होईल.

टेक्‍नोच्‍या स्‍मार्टफोन्‍सची लोकप्रिय स्‍पार्क श्रेणी किफायतशीर दरातील विभागामध्‍ये दर्जात्‍मक डिझाइन, डिस्‍प्‍ले, कॅमेरा आणि सर्वांगीण स्‍मार्टफोन अनुभवासाठी ओळखली जाते. अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. मोठ्या क्षमतेची ६००० एमएएच बॅटरीसह एआय पॉवर चार्जिंग व सुरक्षित चार्जिंग, विशाल ६.५२ इंच डॉट-नॉच डिस्‍प्‍ले आणि उच्‍च दर्जाचा १६ मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर कॅमेरा आहे. तसेच या स्‍मार्टफोनमध्‍ये टाइम लॅप्‍स वैशिष्‍ट्यासह विविध रेकॉर्डिंग सेटिंग्‍ज, व्हिडिओ बोकेह आणि स्‍लो-मो व्हिडिओ हे फीचर्स आहेत.

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

ट्रान्झिशन इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. अरिजीत तालापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”आमच्‍या ‘इंडिया-फर्स्‍ट’ धोरणाशी बांधील राहत टेक्‍नो आकर्षक दरांमध्‍ये विभागातील सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांनी युक्‍त वाजवी व मध्‍यम-दरातील स्‍मार्टफोन्‍स विभागामध्‍ये धुमाकूळ निर्माण करण्‍यासाठी ‘मेड फॉर इंडिया’ स्‍मार्टफोन्‍सवर फोकस देण्‍याचे कार्य सुरूच ठेवेल. हीच बाब लक्षात घेत स्‍पार्क ७ आमचा ग्राहकवर्ग वाढवण्‍यामध्‍ये आम्‍हाला साह्य करेल. आम्‍हाला विश्‍वास आहे की, स्‍पार्क ७ स्‍मार्टफोन्‍सच्‍या नवीन श्रेणीसह आम्‍हाला आमच्‍या ग्राहकांचे प्रेम व पाठिंबा मिळत राहील. काऊंटरपॉइण्‍ट अहवालाच्‍या मते, गेल्‍या वर्षी स्‍मार्टफोन्सची ‘स्‍पार्क’ सिरीज सादर केल्‍यानंतर टेक्‍नो ५,००० रूपये ते १०,००० रूपये विभागामधील प्रख्‍यात ‘टॉप ५ स्‍मार्टफोन ब्रॅण्‍ड्स’ क्‍लबमध्‍ये प्रवेश केला आहे. २०२१ मध्‍ये आम्ही ग्राहकांना आकर्षक दरांमध्‍ये व्‍यापक श्रेणी देत ५-१५ हजार स्‍मार्टफोन्‍स विभागामध्‍ये पोर्टफोलिओ निर्माण करण्‍यासाठी आमची उपस्थिती अधिक दृढ करण्‍याचा प्रयत्‍न करू.”

स्‍पार्क ७ (३ जीबी + ६४ जीबी)

उच्‍च दर्जाच्या १६ मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर कॅमेरासह स्‍लो–मो आणि टाइप लॅप्‍स व्हिडिओ वैशिष्‍ट्ये. स्‍पार्क ७ मध्‍ये १६ मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर कॅमेरासह क्‍वॉड फ्लॅश आहे. मुख्‍य कॅमे-यामध्‍ये एफ/१.८ अर्पेचर आहे, ज्‍यामुळे अधिक सुस्‍पष्‍टपणे फोटोज कॅप्‍चर करता येतात. टाइम-लॅप्‍स व्हिडिओज, स्‍लो मोशन व्हिडिओज, बोकेह मोड, एआय ब्‍युटी मोड आणि एआय पोर्ट्रेट मोड यासारखी प्रिमिअम वैशिष्‍ट्ये असलेला स्‍पार्क ७ सुधारित स्‍मार्टफोन फोटोग्राफी अनुभव देतो. ८ मेगापिक्‍सल सेल्‍फी कॅमेरासह एफ२.० अर्पेचर आणि ड्युअल फ्रण्‍ट फ्लॅशसह अॅडजस्‍टेबल ब्राइटनेस सेल्‍फीप्रेमींचे लक्ष वेधून घेतात.

दीर्घकाळापर्यंत टिकणारी ६००० एमएएच बॅटरी

स्‍पार्क ७ मध्‍ये मोठ्या क्षमतेच्या ६००० एमएएच बॅटरीसह सेफ चार्ज वैशिष्‍ट्य आहे. ही बॅटरी जवळपास ४१ दिवसांचा प्रचंड स्‍टॅण्‍डबाय टाइम, ४२ तासांचा कॉलिंग टाइम, १७ तासांचे वेब ब्राऊजिंग, ४५ तासांचे म्‍युझिक प्‍लेबॅक, १७ तासांचे गेम प्‍लेइंग आणि २७ तासांचा व्हिडिओ प्‍लेबॅक देते. मोठ्या क्षमतेची बॅटरी एआय पॉवर सेव्हिंग, फुल चार्ज अलर्ट सारख्‍या इतर एआय वैशिष्‍ट्यांसह येते आणि ओव्‍हरचार्जिंग टाळण्‍यासाठी फोन पूर्ण चार्ज होताच आपोआपपणे वीजपुरवठा बंद करते.

मोठे डिस्‍प्‍ले, अधिक मनोरंजन

६.५२ इंची एचडी+ डॉट नॉच डिस्‍प्‍लेसह ७२० x १६०० रिझॉल्‍युशनमधून परिपूर्ण सिने‍मॅटिक व्‍युइंग अनुभव मिळतो. ९०.३४ टक्‍के बॉडी स्क्रिन रेशिओ आणि २०:९ एस्‍पेक्‍ट रेशिओसह ४८० नीट्स ब्राइटनेस व्‍यापक सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव देते.

सुलभ मल्‍टीटास्किंगसह व्‍यापक स्‍टोरेज क्षमता

स्‍पार्क ७ मध्‍ये ३ जीबी रॅमसह ६४ जीबी इंटर्नल स्‍टोरेज आहे, जे २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. ज्‍यामुळे स्‍मार्टफोनमध्‍ये सुलभपणे व कोणत्‍याही त्रासाशिवाय तुमची सर्व माहिती स्‍टोअर करता येते. स्‍पार्क ७ अँड्रॉइड ११ वर आधारित आधुनिक एचआयओएस ७.५ वर कार्यसंचालित आहे आणि एकसंधी, विनाव्‍यत्‍यय स्‍मार्टफोन अनुभवासाठी शक्तिशाली ऑक्‍टा-कोअर १.८ गिगाहर्ट्झ सीपीयू हेलिओ ए२५ प्रोसेसरने समर्थित आहे.

सुरक्षितता

स्‍पार्क ७ मध्‍ये इन-बिल्‍ट फेस अनलॉक २.० आणि स्‍मार्ट फिंगरप्रिंट सेन्‍सर आहे, जो युजरचा डेटा व गोपनीयतेचे संरक्षण करतो. फेस अनलॉक २.० फोन दुस-याकडून सुरू करण्‍यापासून संरक्षण करते आणि सूर्यप्रकाशामध्‍ये डिस्‍प्‍ले सुस्‍पष्‍टपणे दिसण्‍याची खात्री देते. स्‍मार्ट फिंगरप्रिंट सेन्‍सर फोनला फक्‍त ०.२ सेकंदांमध्‍ये अनलॉक करते आणि कॉल्‍स स्‍वीकारण्‍यामध्‍ये, फोटो काढण्‍यामध्‍ये व अलार्म्‍स बंद करण्‍यामध्‍ये मदत करते.

Tags: Budget PhonesTecno Spark 7
Previous Post

धक्कादायक! बंद खोलीत सूनेने गळफास घेऊन केली आत्महत्या, सासरचे लोक बाहेरून काढत राहिले व्हिडीओ!

Next Post

ग्राम ईसापुर येथिल कोरोना टेस्ट च्या कॅम्पकडे नागरीकांनी फिरवली पाठ

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार
Featured

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

November 1, 2023
aadhaar-pan-
Featured

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

February 16, 2023
digital payment
Featured

Digital Payment व्यवहारात चार वर्षा मध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ!

February 14, 2023
Republic Day
Featured

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे

January 25, 2023
Next Post
ग्राम ईसापुर येथिल कोरोना टेस्ट च्या कॅम्पकडे नागरीकांनी फिरवली पाठ

ग्राम ईसापुर येथिल कोरोना टेस्ट च्या कॅम्पकडे नागरीकांनी फिरवली पाठ

दुसर्‍या लाटेतील कोरोना वेगाने करीत आहे फुफ्फुसांचे नुकसान

दुसर्‍या लाटेतील कोरोना वेगाने करीत आहे फुफ्फुसांचे नुकसान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.