सातारा : लाॅकडाऊन उठवल नाही तर लोक आणि मी ऐकणार नाही. शासनामध्ये जी तज्ञ बसली आहेत, ती मला तज्ञ वाटत नाहीत. उद्यापासून नो लाॅकडाऊन, मारामारी झाली तुम्ही जबाबदारी, पोलिसांना लोक चोपून काढतील, असे सांगत लाॅकडाऊनला छ. उदयनराजे भोसले यांनी विरोधात आंदोलन केले .
लाॅकडाऊनच्या विरोधात भाजपचे राज्यसभा खासदार व छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील पोवईनाका येथे कटोरा घेवून पैसे मागितले. लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांची वाईट अवस्था झालेली असून भ्रष्टाचार करणाऱ्यांना अजून पैसे कमी पडत असल्याने कटोरा घेवून पैसे जमा केले असल्याचे छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
छ. उदयनराजे भोसले म्हणाले, मी दुकानदार किंवा व्यापाऱ्यांच्या बाजूने नाही बोलत, मी सर्वसामान्यांच्या बाजूने बोलत आहे. तुम्ही सगळं बंद तुम्ही केल. उपासमारी तुम्ही आणली. तुमच्या बापाची इस्टेट आहे. आजची परिस्थिती आली आहे, त्याला तुम्ही जबाबदार आहात.
मी पोलिसांचा आदर करतो. परंतु काठी मारायची नाही. अनेक कामगार लोक आहेत. त्यांनी कर्ज काढले आहे. लोकांना भिकेला लावणार का तुम्ही. खायला नाही काय. गोरगरिबांचे काय नुकसान करता. तुम्ही अधिकार कोणी दिला, संशोधकांनी का वक्तव्य केल नाही. तुमचे काळे कारनामे लपविण्यासाठी लाॅकडाऊन केला असल्याची टीका छ. उदयनराजे भोसले यांनी केली.