पुणे : राज्यात पुढील चार दिवस वादळी वार्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने गुरुवारी त्याबाबतचा इशारा दिला आहे. राज्यातील कोल्हापूरसह 24 जिल्ह्यांत यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
9 ते 12 एप्रिल दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण राहील. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा दाह कमी होऊन दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात या चार दिवसांत वादळी वार्याह गारपीट व मुसळधार पाऊस होऊ शकतो. उर्वरित जिल्ह्यात मात्र मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.