• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा संयुक्‍त (पुर्व) परीक्षा: ३३ उपकेंद्र परिसरात दि.११ रोजी प्रतिबंधात्मक आदेश

Team by Team
April 8, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, शिक्षण
Reading Time: 2 mins read
79 1
0
MPSC
12
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा संयुक्‍त (पुर्व) परीक्षा – २०२० चे रविवार दि. ११ रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पात्र परीक्षार्थींची परीक्षा अकोला शहरातील  एकुण ३३ उपकेंद्रावर सकाळी ११ वाजेपासून होणार आहे.

या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होवू नये, तसेच कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये  या करीता सर्व ३३ परीक्षा उपकेंद्राच्या १०० मिटर परिसरात रविवार दि.११ रोजी सकाळी सहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हे आदेश निर्गमित केले असून  या परीक्षा केंद्रावर या कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळी एकत्रितरीत्‍या प्रवेश करण्यास व घोषणा  देण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्‍या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्‍य व्‍यक्‍तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्‍य करता येणार नाहीत.  परीक्षा केंद्राच्‍या १०० मीटर परिसरातील झेरॉक्‍स सेंटर, फॅक्‍स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर एसटीडी बुथ, ध्‍वनीक्षेपक, इत्‍यादी माध्‍यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्‍यात येतील. परीक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल फोन, सेल्‍युलर फोन, ई मेल व इतर प्रसार माध्‍यमे घेवून प्रवेश करण्‍यास मनाई आहे.परीक्षा केंद्रावर कोणत्‍याही अनाधिकृत व्‍यक्‍ती व  वाहनास प्रवेशाची मनाई राहील.

या प्रतिबंधात्मक आदेशातून परीक्षा केंद्रावर नियुक्‍त अधिकारी/ कर्मचारी/परीक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांना परीक्षा संबंधित कर्तव्‍य पार पाडण्‍याचे दृष्‍टीने लागू राहणार नाहीत,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोविड पार्श्वभुमिवर खालील सुचनाही देण्यात आल्या आहेत.

यावेळी परीक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परीक्षार्थी / अधिकारी / कर्मचाऱ्यांचे थर्मल / इफ्रारेड थर्मामिटरव्‍दारे तापमान तपासण्‍यात यावे. हवा खेळती रहावी यासाठी परीक्षा केंद्रावरील सर्व खिडक्‍या तसेच दरवाजे उघडया ठेवाव्‍या.सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांना मास्‍कचा वापर करणे बंधनकारक राहिल. मास्‍क लावल्‍याशिवाय प्रवेश देण्‍यात येवू नये. प्रत्‍येक परीक्षार्थी मध्‍ये किमान तीन फुटाचे अंतर राहील, अशी बैठक व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. परीक्षा केंद्राचे प्रवेशव्‍दारासमोर सॅनिटायझरची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. परीक्षा केंद्राच्‍या परिसराचे सोडियम हायपोक्‍लोराईटच्‍या सहाय्याने निर्जंतुकीकरण करण्‍यात यावे. कोणत्‍याही परीक्षार्थी / अधिकारी / कर्मचारी यांना कोव्हिड-१९ ची लक्षणे दिसून आल्‍यास तात्‍काळ नजीकच्‍या रूग्‍णालयात भरती करावे.

परीक्षा उपक्रेंद्रांची यादी-

अ.    क्र. उपकेंद्राचे नाव  व पत्‍ता
1 शिवाजी आर्ट,कॉमर्स अॅन्‍ड सायन्‍स कॉलेज मोर्णा बिल्‍डींग शिवाजी पार्क अकोट रोड अकोला
2 खंडेलवाल ज्ञानमंदिर कॉन्‍व्‍हेन्‍ट गोरक्षण रोड अकोला
3 श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय मुर्तीजापूर रोड, नेहरू पार्क, अकोला
4 सिताबाई कला महाविद्यालय सिव्‍हील लाईन रोड अकोला
5 एल.आर.टी.कॉलेज ऑफ कॉमर्स रतनलाल प्‍लॉट अकोला भाग-1
6 एल.आर.टी.कॉलेज ऑफ कॉमर्स रतनलाल प्‍लॉट अकोला भाग-2
7 माऊंट कारमेल स्‍कुल अग्रसेन चौक स्‍टेशन रोड अकोला
8 भारत विद्यालय तापडीया नगर अकोला
9 शिवाजी आर्ट, कॉमर्स अॅन्‍ड सायन्‍स कॉलेज पुर्णा बिल्‍डींग शिवाजी पार्क अकोट रोड अकोला
10 श्री शिवाजी हायस्‍कूल मुख्‍य शाखा देशमुख पेठ शिवाजी पार्कजवळ अकोट रोड अकोला
11 भिकमचंद खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्‍लॉटस डाबकी रोड जुने शहर अकोला
12 जि.एस.कॉन्‍व्‍हेन्‍ट मुख्‍य डाक घरामागे अकोला
13 कोठारी कॉन्‍व्‍हेन्‍ट विद्यानगर, गोरक्षण रोड अकोला
14 नोएल इंग्लिश हायस्‍कूल विभागीय वर्कशॉपच्‍या मागे, कौलखेड रोड अकोला
15 जागृती विद्यालय व उच्‍च माध्‍य. विद्यालय,रणपीसे नगर अकोला
16 उस्‍मान आझाद ऊर्दू हायस्‍कूल, रतनलाल प्‍लॉट अकोला
17 होलीक्रॉस कॉन्‍व्‍हेन्‍ट हायस्‍कूल, जठारपेठ चौक अकोला
18 गुरूनानक विद्यालय, गांधीनगर, सिंधी कॅम्‍प अकोला
19 श्री शिवाजी विद्यालय हरिहर पेठ जुने शहर अकोला
20 ज्‍युबिली इंग्लिश हायस्‍कूल / ज्‍युनिअर कॉलेज शिक्षण संकुल, रामदासपेठ अकोला
21 न्‍यु इंग्लिश हायस्‍कूल, शिक्षण संकुल, रामदासपेठ पोलीस स्‍टेशनच्‍या बाजूला अकोला
22 राधाकिसन लक्ष्‍मीनारायण तोष्‍णीवाल  कॉलेज ऑफ  सायन्‍स,  सिव्‍हील लाईन रोड अकोला
23 मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्‍लॉट, डाबकी रोड जुने शहर, अकोला
24 डि.ए.व्‍ही कॉन्‍व्‍हेन्‍ट स्‍कूल महात्‍मा गांधी रोड, अकोला
25 मेहरबानु ज्‍यु. कॉलेज ऑफ सायन्‍स गांधी रोड अकोला
26 खंडेलवाल इंग्लिश स्‍कुल, गोडबोले प्‍लॉट डाबकी रोड जुने शहर अकोला
27 मनुताई कन्‍या शाळा, सिटी कोतवाली पोलीस स्‍टेशन जवळ टिळक रोड अकोला
28 अकोला आर्टस कॉमर्स सायन्‍स कॉलेज सहकार नगर, गोरक्षण रोड अकोला
29 सावित्रीबाई फुले जि.प. माध्‍य. कन्‍या शाळा वसंत देसाई स्‍टेडीयम समोर स्‍टेशन रोड अकोला
30 सुधाकरराव नाईक महाविद्यालय, तुकाराम चौक,अकोला
31 डवले ज्‍युनिअर कॉलेज, चाचोंडी रोड मोठी उमरी अकोला
32 महाराष्‍ट्र माध्‍यमिक शाळा केडीया प्‍लॉट जठारपेठ रोड अकोला
33 बी.आर. हायस्‍कूल ताजनापेठ मुख्‍य डाक घरामागे अकोला
Tags: MPSC Combined Exam
Previous Post

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; आठ जणांचा मृत्यू, २६३ कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

लसीबाबत संभ्रम पसरवणे मूर्खपणाचे; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला सुनावले

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
फक्त तासाभरात कलटी मारली? मोफत कोरोना लसीवर आरोग्यमंत्र्यांकडून आता स्पष्टीकरण!

लसीबाबत संभ्रम पसरवणे मूर्खपणाचे; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला सुनावले

murder crime

रिमोटवरुन भांडण, तीन वर्षांची मुलगी म्हणाली बाबाच बरोबर, आईने चिमुकलीला संपवलं

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.