• Subscribe Whatsapp
  • Covid 19 Tracker India
  • Live Stream
33 °c
Akola
Thursday, April 22, 2021
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • फिचर्ड
    • आरोग्यपर्व
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Live Stream
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • फिचर्ड
    • आरोग्यपर्व
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Live Stream
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

लसीबाबत संभ्रम पसरवणे मूर्खपणाचे; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला सुनावले

Team by Team
April 8, 2021
in Corona Featured, Featured, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
0
फक्त तासाभरात कलटी मारली? मोफत कोरोना लसीवर आरोग्यमंत्र्यांकडून आता स्पष्टीकरण!
11
SHARES
446
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नवी दिल्ली:  केंद्र सरकारने जर लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात केला नाही तर पुढील दोन दिवसांत लसीकरण बंद पडेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सलग ट्विट करून महाराष्ट्र सरकारला झापले आहे. ‘कोरोना लसीबाबत संभ्रम निर्माण करणे हे मूर्खपणाचे आहे, महाराष्ट्रात लसीकरणाचे वेग कमी असून सरकाला आपल्या जबाबदारीचे भान का नाही? ‘असा सवालही त्यांनी विचारला आहे.

बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात लशींची तुटवडा असल्याचे सांगितले. ‘राज्यात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच लशींचा साठा आहे. तीन दिवसांत लस मिळाली नाही तर लसीकरण बंद पडेल.’ असे सांगितले.

सध्या महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा स्फोट झाला आहे. राज्यात सद्यस्थितीत ४ लाख ७० हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. देशातील १० हॉटस्पॉट जिल्ह्यांपैकी सात जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे सर्वाधिक संसर्गित राज्य आहे. एकीकडे महाराष्ट्राला सर्वाधिक लशीची गरज असताना गुजरात आणि राजस्थान या राज्यांना लशींचा पुरवठा केला जात असल्याबाबत बुधवारी दिवसभर चर्चा सुरू होती. राजेश टोपे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. केवळ वसुलीसाठी महाराष्ट्र सरकार कोरोनाशी लढत नाही, असा घनाघाती आरोप केला.

कोरोना के नियंत्रण के लिए महाराष्ट्र सरकार द्वारा ज़िम्मेदारी से कार्य न करना समझ से परे है।

वैक्सीन आपूर्ति की निगरानी लगातार की जा रही है और राज्य सरकारों को इसके बारे में नियमित रूप से अवगत कराया जा रहा है। इसके बावजूद लोगों में दहशत फ़ैलाना मूर्खता है।@PMOIndia pic.twitter.com/nHfO8vppqF

— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) April 7, 2021

डॉ. हर्षवर्धन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे,  महाराष्ट्रात केवळ ८६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये ७२ आणि ६४ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. देशभरातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ९० टक्के लसीकरण केले आहे. कोरोना नियंत्रणाच्या कामात महाराष्ट्र सरकार आपली जबाबदारी का झटकत आहे, हेच समजत नाही. लस पुरविण्याबाबत केंद्र सरकार दक्ष असून राज्य सरकारना याबाबत सातत्याने माहिती दिली जात आहे. त्याहीपलिकडे जाऊन लोकांमध्ये दहशत पसरवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे, असे खडे बोलही सुनावले आहेत.

१८ वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट लसीकरण करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती, त्याबाबत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘काही राज्ये १८ वर्षांवरील नागरिकांचे सरसकट लसीकरण करावे अशी मागणी करत आहेत. याचा अर्थ असा होतो की, त्यांनी आपल्या राज्यातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले आहे. परंतु त्यात अजिबात तथ्य नाही. दुसऱ्या डोसबाबत विचार केला तर महाराष्ट्रात केवळ ४१ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.’

सरकारचा ढिसाळ कारभार कारणीभूत
‘कोरोना विषाणूशी लढत असताना महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या कारभाराचा आणि प्रासंगिक दृष्टीकोनाचा मी स्वत: साक्षीदार आहे. राज्य सरकारच्या अशा अभावांमुळेच संपूर्ण देशाच्या कोरोना विरुद्ध लढण्याच्या मोहिमेला फटका बसला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू आणि संसर्गाचे प्रमाण आहे. राज्यातील ढिसाळ कारभार हेच याचे प्रमुख कारण आहे,’ असे हर्षवर्धन म्हणाले.

Tags: central govenmentcorona vaccination
Share6Tweet2SendShare
Previous Post

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा संयुक्‍त (पुर्व) परीक्षा: ३३ उपकेंद्र परिसरात दि.११ रोजी प्रतिबंधात्मक आदेश

Next Post

रिमोटवरुन भांडण, तीन वर्षांची मुलगी म्हणाली बाबाच बरोबर, आईने चिमुकलीला संपवलं

Related Posts

ऑनलाईन
Featured

ऑनलाईन शिक्षणाकरिता सरकारकडून ‘मोफत ऑनलाईन रिचार्ज’ अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका

April 22, 2021
कोरोना : औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठ्यावर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Corona Featured

कोरोनात ऑक्सिजन सिलिंडरची नक्की कधी गरज भासते? जाणून घ्या उत्तर

April 22, 2021
काळजी न घेतल्यास नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन ?
Corona Featured

राज्यात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन, आज रात्री ८ पासून जिल्हा आणि शहरबंदी

April 22, 2021
अकाेला
Featured

अकाेला महिला सफाई कर्मचाऱ्यांना करावी लागतील नाला सफाईची कामे.

April 22, 2021
Covid19
Corona Featured

Covid19 चा धोका कमी करण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेवर द्या अधिक लक्ष.

April 22, 2021
CoronaVirus : रेमडेसिविर,ऑक्सिजनशिवाय ८५ टक्के रुग्ण बरे होतायेत – एम्स संचालक
Corona Featured

CoronaVirus : रेमडेसिविर,ऑक्सिजनशिवाय ८५ टक्के रुग्ण बरे होतायेत – एम्स संचालक

April 22, 2021
Next Post
रिमोटवरुन भांडण, तीन वर्षांची मुलगी म्हणाली बाबाच बरोबर, आईने चिमुकलीला संपवलं

रिमोटवरुन भांडण, तीन वर्षांची मुलगी म्हणाली बाबाच बरोबर, आईने चिमुकलीला संपवलं

Stay Connected

  • 7.3k Fans
  • 263 Followers
  • 33k Followers
  • 2.3k Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
महाराष्ट्र लॉकडाऊन: काय सुरू, काय बंद? वाचा संपूर्ण नियमावली

ब्रेकिंग: राज्यात आज रात्रीपासून नवी नियमावली; काय बंद आणि काय सुरू? वाचा संपूर्ण माहिती

April 20, 2021
भूकंप

अकोल्यात भूकंपाचे धक्के, तीव्रता कमी असल्यानं जिवीत हानी नाही

April 17, 2021
police-maharashtra-1

जिल्ह्यात 36 कलम लागू ! पोलिस अधिकाऱ्यांना जादा अधिकार प्रदान

April 19, 2021
Jitendra Papalkar

राज्यासह अकोला जिल्ह्यात ३० एप्रिल पर्यंतचे संचारबंदी आदेश जारी, वाचा काय सुरु; काय बंद

April 15, 2021
ऑनलाईन

ऑनलाईन शिक्षणाकरिता सरकारकडून ‘मोफत ऑनलाईन रिचार्ज’ अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका

April 22, 2021
कोरोना : औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठ्यावर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

कोरोनात ऑक्सिजन सिलिंडरची नक्की कधी गरज भासते? जाणून घ्या उत्तर

April 22, 2021
काळजी न घेतल्यास नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन ?

राज्यात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन, आज रात्री ८ पासून जिल्हा आणि शहरबंदी

April 22, 2021
Google Chrome चे ‘हे’ फीचर्स माहितीहेत का?; युजर्सला होईल मोठा फायदा

Google Chrome चे ‘हे’ फीचर्स माहितीहेत का?; युजर्सला होईल मोठा फायदा

April 22, 2021

Recent News

ऑनलाईन

ऑनलाईन शिक्षणाकरिता सरकारकडून ‘मोफत ऑनलाईन रिचार्ज’ अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका

April 22, 2021
कोरोना : औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठ्यावर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

कोरोनात ऑक्सिजन सिलिंडरची नक्की कधी गरज भासते? जाणून घ्या उत्तर

April 22, 2021
काळजी न घेतल्यास नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन ?

राज्यात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन, आज रात्री ८ पासून जिल्हा आणि शहरबंदी

April 22, 2021
Google Chrome चे ‘हे’ फीचर्स माहितीहेत का?; युजर्सला होईल मोठा फायदा

Google Chrome चे ‘हे’ फीचर्स माहितीहेत का?; युजर्सला होईल मोठा फायदा

April 22, 2021
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • फिचर्ड
  • Live Stream

© 2020 Our Media Networks - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • फिचर्ड
    • आरोग्यपर्व
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Live Stream

© 2020 Our Media Networks - Managed by Fusion Technologies.

व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/H3iGnvYN3ibEEfXIXJsTrf

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

आम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा 
Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker