• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 24, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्ह्यात आणखी १५७ पॉझिटीव्ह, चौघांचा मृत्यू !

Team by Team
April 7, 2021
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
Corona Cases
12
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : दि.६ दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ११४९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९९२ अहवाल निगेटीव्ह तर १५७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ३८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे दि.५ रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १०४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २९२९५(२३५२१+५५९७+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तर आज दिवसभरात आरटीपीसीआर (सकाळ) १२९+आरटीपीसीआर(सायंकाळ) २८+ रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट १०४= २६१ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १६३४७३ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १६०८२७ फेरतपासणीचे ३७९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२६७ नमुने होते. आजपर्यंत एकूण १६३३३१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १३९८१० आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

१५७ पॉझिटिव्ह

दि.६ दिवसभरात १५७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी १२९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४४ महिला व ८५ पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील नऊ, महागाव बु., जठारपेठ, मलकापूर, कौलखेड व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी पाच, मोठी उमरी, लहान उमरी, गुडदी रोड येथील प्रत्येकी चार, जुने शहर, सिंधी कॅम्प, खोलेश्वर, राऊतवाडी, सुकोडा, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन, चिखलगाव,दक्षतानगर, हिंगणा रोड, वाशीम बायपास, डाबकी रोड, पीकेव्ही क्वार्टर, खडकी, गजानन नगर, बाळापूर,जीएमसी आणि दाताळा येथील प्रत्येकी दोन तर अंतरी, मांजरी, राधेनगर, बेलखेड, गोरक्षण रोड, शंकरनगर, नकाशी, कीर्तीनगर, खीरपूरी खु., मोहम्मद अली रोड, माधवनगर, सेलूबाजार, जवाहर नगर, गंगानगर, सुधीर कॉलनी, मनकर्णा प्लॉट, रेल, तुकाराम चौक, मुकुंद नगर, सस्ती, आलेगाव, टिळकरोड, तोष्णिवाल लेआऊट, गायत्री नगर, रुईखेड, दानापुर, चोहोट्टा, डेवडा, उरळ, केशवनगर, न्यू खेतान नगर, पहूरजिरा, रणपिसेनगर, हातगाव, लंघापूर, कंजरा, माना, शिवनी, मनबदा, गितानगर, पारस, चतारी, बोरगाव मंजू येथिल प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी २८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व १८ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातील गितानगर, कमला नगर, शिवनी, शिवापूर, गोरक्षण रोड आणि कपिलवस्तू नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित रघुवीर नगर, भौरद, टीटीएन कॉलेज, पारडी, मलकापूर, बोरगाव मंजू, कृषी नगर, अकोली जहागिर, केशव नगर, यशवंत नगर, जीएमसी, खडकी, शिर्ला, विवरा, पातूर आणि दताळा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान दि.५ रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात १०४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

चौघांचा मृत्यू

दरम्यान आज दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला. त्यात सकाळी झालेल्या नोंदीत देवरावबाबा चाळ, अकोला येथील ६३ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असून या महिलेस दि.५ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य रुग्ण डाबकी रोड येथील ६२ वर्षीय पुरुष असुन या रुग्णास दि.२७ मार्च रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णांचा आज मृत्यू झाला. तर सायंकाळी दोन जणांचे मृत्यू झाले. त्यात एका खाजगी रुग्णालयात अकोट येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि.२ रोजी दाखल केले होते. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाळापूर येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि.१ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

३८७ जणांचा डिस्चार्ज

आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पिटल येथुन तीन, कोविड केअर सेंटर बार्शी टाकळी दोन, सहारा हॉस्पिटल तीन, आरकेटी आयुर्वेदिक कॉलेज एक, बॉईज होस्टेल दोन, हार्मनी हॉस्पिटल एक, अवघाटे हॉस्पिटल एक, बिडाडे हॉस्पिटल आठ, नवजिवन हॉस्पिटल आठ, ओझोन हॉस्पिटल दोन, सुर्यचंद्र हॉस्पिटल चार, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल चार, हॉटेल रिजेन्सी चार, आधार हॉस्पिटल मुर्तिजापुर दोन, स्कायलार्क हॉटेल तीन, इंदिरा हॉस्पिटल दोन, अकोट कोविड केअर सेंटर येथील दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २५ तर होम आयसोलेशन मधील ३१० अशा एकूण ३८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

३८२७ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २९२९५(२३५२१+५५९७+१७७) आहे. त्यात ४७८ मृत झाले आहेत. तर २४९९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३८२७ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona updatesakola newsAkola News Marathi
Previous Post

२५ वर्षांपुढील सर्वांना लस द्या; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

Next Post

सार्वजनिक व खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाची माहिती कळविण्याचे आवाहन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

सार्वजनिक व खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाची माहिती कळविण्याचे आवाहन

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

अकोला - गहू व भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी सुरु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.