अकोला(प्रतिनिधी)– आज स्थानिक अशोक वाटिका चौकात दुपारी 1।30 वा चे सुमारास एक मोठा आईशार ट्रक क्र MH 30 B L 9631 हा नेहरू पार्क कडून खामगाव कडे जाण्यासाठी अशोक वाटिका चौकातून जेल चौका कडे वळण घेत असतांना मागून एक इसम ज्ञानेश्वर तुकाराम बाजोड रा शिवसेना वसाहत हा दुचाकी क्र MH 30 AK 6002 ने आला जेल चौका कडे जाण्याच्या घाईगर्दी मध्ये चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला परंतु मोटारसायकल स्लिप झाल्याने अचानक आईशार च्या पुढील बाजूने ट्रक च्या बरोबर मध्यभागी पडला, हा घटनाक्रम तिथे कर्त्यव्य बजावत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार कैलास सानप ह्यांचे समोर घडल्याने त्यांनी त्वरित वेगाने धाव घेऊन आयशरच्या ड्राइवर ला ट्रक जागेवरच थांबविण्यास सांगितले व लगेच दुसरे वाहतूक पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गायकवाड ह्यांचे व अपघात घडताच आजूबाजूला जमा झालेल्या नागरिकांचे मदतीने जखमी इसम ज्ञानेश्वर बाजोड ह्यांना व ट्रक मध्ये फसलेल्या दुचाकीला बाहेर काढून पोलीस स्टेशन खदान चे पोलीस कर्मचारी घटनास्थळी बोलावून ट्रक पोलीस स्टेशनला पाठवला व जखमी इसमास सर्वोपचार रुग्णालयात पाठविले, सदर इसमास पायाला किरकोळ मार लागला असून कोणताही गंभीर मार लागला नाही, शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार कैलास सानप ह्यांनी प्रसंगावधान दाखवून त्वरित धाव घेऊन ट्रक जागेवरच थांबविला नसता तर पुढील किंवा मागील चाका मध्ये येऊन नमूद इसमास गंभीर जखमी किंवा दुर्देवाने प्राणास सुद्धा मुकावे लागू शकले असते, उपस्थित नागरिकांनी वाहतूक पोलीस कैलास सानप ह्यांचे कौतुक केले , म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला शिवा ,त्यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल।