तेल्हारा (आनंद बोदडे)– प्रज्ञासूर्य, ज्ञानाचे प्रतिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पाशवी गुलामगिरीत खितपड पडलेल्या कष्टकरी ,दीनहीन,कष्टकरी जनतेला स्वाभिमानाचा मंत्र देऊन बाहेर काढले,त्यावेळी लाखो आंबेडकरवाद्यांनी घरावर तुळशीपत्र ठेऊन समाज जागृतीचे काम केले.असह्य त्रास सहन केला आणि नव समाजाची नवीन पिढी घडविली. त्यापैकी अनेक जन आज हयात नाहीत आणि जे आहेत ते अतिशय कष्टमय जीवन जगत आहेत तसेच ज्यांच्यासाठी एवढा त्रास सहन केला तेच लोक आज अश्या निष्ठावान आंबेडकरवाद्यांना विसरलेत, की काय आज अशी भयावह अवस्था समाजात निर्माण झाली आहे. नवीन पिढीला राबलेल्या आंबेडकरवाद्यांच्या त्यागाची कल्पना नसल्यामुळे ही पिढी आत्मकेंद्रित झालेली आहे . अशीच परिस्थिती राहिली तर मागचे दिवस पुढे आल्यावाचून राहणार नाही आणि त्याचा फटका भावी पिढीला बसणार आहे या बाबीचे विस्मरण होऊ नये आणि भावी पिढी जागृत व्हावी यासाठी तालुक्यातील पासस्ट वर्षावरील निष्ठावान महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा उचित असा गुणगौरव सोहळा आयोजित करण्याचा निर्णय तेल्हारा येथे नव्यानेच स्थापन झालेल्या सर्व समावेषक ‘आंबेडकरवादी विचार मंच ‘यांच्यावतीने घेण्यात आला. त्याबाबतची बैठक नुकतीच इसापूर तालुका तेल्हारा येथील सरपंच सौ.मीराताई आनंद बोदडे यांच्या अध्यक्षतेखाली महाड सत्याग्रहाच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सार्वजनिक मैत्रेय वाचनालय येथे घेण्यात आला .सौ मिराताई बोदडे यांनी नव्यानेच सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यामुळे त्यांचा शाहीर मोतीराम पोहरकर हस्ते सत्कार करण्यात .
निष्ठावान आंबेडकरवाद्यांचा गुणगौरव करणे का आवश्यक आहे याबाबतचे सविस्तर विवेचन आंबेडकरवादी विचार मंचाचे निमंत्रक श्री.गणेशराव तायडे यांनी केले. अधिक उशीर न करता निष्ठावान आंबेडकरवादी यांचा शोध घेऊन त्यांना आणि त्यांच्या परिवाराचा उचित असा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच ज्यांना श्रवणयंत्राची किंवा चष्म्याची आवश्यकता आहे त्यांना वेळीच मदत करण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले असता पत्रकार श्री.आनंद बोदडे यांनी श्री.शंकरराव पोहरकार यांना गुणगौरव समारंभाच्या अगोदर श्रवणयंत्र देण्याचे जाहीर केले.
सभेमध्ये शाहीर मोतीराम भानाजी पोहरकार, गोपाळराव तायडे, ज्ञानदेवराव बोदडे, शंकरराव पोहरकार, .भाऊदेव भटकर बेलखेड, नगरसेवक गोवर्धन पोहरकार, रमेश वाकोडे, मिलिंद नगर , तेजराव गवई, शहादेव पंढरी भोजने,मोहन जगदेवराव तायडे, वामनराव भोजने.भांबेरी , वासुदेवराव वानखडे.अटकळी, दादाराव पांडुरंग खर्चे.जस्तगाव, गजानन उत्तम तायडे, .जीवन जानुजी बोदडे,भांबेरी, प्रदीप शालिग्राम तेलगोटे पाथर्डी, रामेश्वर पोहेकर, जीवन तुळशीराम इंगळे, अमर गौतम भारसाकळे, पत्रकार आनंद बोदडे,पंजाबराव तायडे, रवींद्र सुखदेव दामोदर अकोली रुपराव, नाजुकराव दारोकर, रक्षित बोदडे आणि युवा नेता भारत पोहरकर इत्यादींनी सभेमध्ये मार्गदर्शन केले आणि एक ऐतिहासिक गुणगौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी तनमनधनाने सहभागी होण्याचे आवाहन सरपंच मिराताई बोदडे यांनी केले ,सभेचे सूत्रसंचालन .रामेश्वर पोहेकर यांनी केले. आभार प्रदर्शन मोहनराव तायडे यांनी केले.