• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दरवर्षी दूषित पाण्यामुळे सुमारे तीन लाख मुले मृत्युमुखी

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 12, 2021
in Featured, आरोग्य
Reading Time: 1 min read
80 1
0
दरवर्षी दूषित पाण्यामुळे सुमारे तीन लाख मुले मृत्युमुखी
16
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

भारतातील भूजल आणि भूतलावरील पाणी अतिशय दूषित असून केवळ ३२ टक्के भारतीय घरांमध्ये प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी मिळते. दरवर्षी या दूषित पाण्याशी निगडित आजारांमुळे सुमारे तीन लाख मुले मृत्युमुखी पडतात. अतिसारासारख्या आजारामुळे ५० टक्के लोकांचा मृत्यू होतो. बंगळुरू व नोएडा येथील ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी’ यांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

भारतातील प्रत्येक घरात प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी पुरवण्यासाठी शासन दरवर्षी विविध योजना आणते. तरीही देशभरातील घरांमध्ये प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी पुरवणे ही जटील प्रक्रिया आहे. पाण्याचे दूषित स्त्रोत नाहीसे करून ते पाणी शुद्ध करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता आहे. या अभ्यासात पाणीपुरवठा प्रक्रियेची कार्यक्षमता आणि टिकाव वाढवण्यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या काही पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. पाणी स्वच्छ करण्यासाठी आणि त्या प्रक्रियेसाठी किती ऊर्जा आवश्यक आहे, याचा अंदाज यात मांडण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक भार कमी होण्यास आणि पर्यावरणाचे नुकसान रोखण्यास मदत होते. भारतातील सुमारे ६४० जिल्ह्य़ांमधून हा अभ्यास करण्यात आला आहे. विशेषत: भूगर्भातील पाणी हे मुख्य स्त्रोत असलेल्या भागात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी समुदायस्तरावरील उपाययोजना राबवण्याचा प्रस्ताव देखील या अभ्यासात मांडण्यात आला आहे. यात प्रामुख्याने सामुदायिक जलशुद्धीकरण प्रणालीचा समावेश आहे. घरगुती कारणासाठी शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना शुद्धीकरणासाठी आवश्यक ऊर्जेचे प्रमाण यामुळे कमी होईल. अक्षय ऊर्जेचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी केला जाऊ शकतो. या ऊर्जा स्त्रोताचा वापर करुन पाण्याचे शुद्धीकरण करून सर्व घरांना ते पुरवल्यास दरवर्षी १० हजार ९०० ते ११ हजार ७०० कोटी रुपये खर्च येईल. औष्णिक ऊर्जा वापरून के लेल्या पाणी शुद्धीकरणाच्या तुलनेत हा खर्च ४० ते ६० टक्क्यांनी कमी होईल. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास देखील कमी होईल, असेही निरीक्षण या अभ्यासात मांडण्यात आले आहे.

– देशभरातील पाण्याचे स्त्रोत आजार पसरवणाऱ्या जंतूंच्या अधिक प्रमाणामुळे दूषित झाले आहेत.

– भारतातील २४ राज्यांमधील बहुतेक जिल्ह्य़ांमध्ये भूजलात जड धातू आणि इतर धातूंचे प्रमाण अधिक आहे.

– या पाण्यामुळे टायफाईड, कॉलरा, अतिसार, कर्करोग, हाडांशी संबंधित आजार होतात. दरवर्षी सुमारे ३७.७ दशलक्ष लोकांना या         आजाराचा त्रास होतो आणि दरवर्षी सुमारे ७३ दशलक्ष कामकाजाचे दिवस वाया जातात.

– या आजारामुळे कामावर परिणाम होतो. त्याचा परिणाम राष्ट्रीय उत्पादकतेवर होतो. परिणामी, मोठय़ा प्रमाणावर आर्थिक भार पडतो.

Tags: children die due to contaminated waterground water pollutionmarathi news
Previous Post

बिग ब्रेकिंग- अकोला जिल्ह्यातील शनिवार रविवारचा लॉकडाऊन रद्द

Next Post

अकोला जिल्ह्यात 353 कोरोना पॉझिटिव्ह;आणखी दोघांचा मृत्यू

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Corona Cases

अकोला जिल्ह्यात 353 कोरोना पॉझिटिव्ह;आणखी दोघांचा मृत्यू

थेट संपर्कात असलेल्या व्यक्तींची दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य -पालकमंत्री बच्चु कडू

थेट संपर्कात असलेल्या व्यक्तींची दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य -पालकमंत्री बच्चु कडू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.