अकोला (डॉ चांद शेख) – राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार २०२१ सालचे राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन शनिवार दिनांक १० एप्रील २०२१ रोजी अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी १०ः३० ते संध्याकाळी ५ः३० दरम्यान करण्यात येणार आहे . न्यायालयात प्रलंबीत असलेले दावे तडजोडीने आणि सामंजस्याने निकाली निघावेत यासाठी आयोजिण्यात येणाऱ्या लोक अदालतीमध्ये दावा निकाली काढता येणार आहे . याबाबत राज्यातील जिल्हाप्रमुख न्यायाधीस व विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांना निर्देश देण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पाहुन पक्षकारांनी तसेच सर्वांनी कोरोना संबंधीचे शासनाच्या नियमांचे पालन करावे, या वर्षातील लोकअदालत असून या मध्ये भुसंपदन, धनादेश न वटने, वैवाहिक स्वरुपाचे दावे, मोटार अपघाताचे दावे, दिवानी व फौजदारी इत्यादी प्रकरनाचा निपटारा करण्यात येणार आहे तरी उपरोक्त फायदे विचारात घेता ज्या पक्षकारांची वर नमुद संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा खतला पुर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत त्यांना स्वरूप एस. बोस,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राघीकरण, अकोला यांनी जाहीर अव्हान केले आहे की त्यांनी आपली प्रलंबीत व दाखल पुर्व प्रकरणे सदर राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरीता संबंधीत न्यायालय, तालुका विधी सेवा समीती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, अकोला (०७२४-२४१०१४५ ) यांच्याशी संपर्क साधावा आणि राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद समोपचाराने कायमचे मिटवावेत असे अध्यक्ष श्री य . गो . खोब्रागडे व स्वरुप बोस , सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अकोला यांनी जाहीर आव्हान केले आहे.