Co-WIN Registrations (Co-WIN) अॅपमध्ये आलेल्या काही अडचणी दूर केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना लसीकरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती दिली. ज्यामध्ये कोरोना लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रीया आणि इतरही काही गोष्टी सविस्तरपे स्पष्ट करण्यात आल्या. कोरोना लसीकरणासाठी http://cowin.gov.in हे पोर्टल किती महत्त्वपूर्ण आहे, याबाबतही आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली.
आरोग्य मंत्रालयानं ट्विटरद्वारे माहिती देत म्हटलं, ‘कोरोना लसीकरणाची तारीख घेण्यासाठी नोंदणी ही #CoWIN पोर्टलच्याच माध्यमातून करावी. #CoWIN App चा सर्वसमान्य लाभार्थींसाठी उपयोग नाही. प्लेस्टोअरवर असणारं हे अॅप फक्त प्रशासकीय वापरासाठीच आहे’.
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात http://cowin.gov.in (CoWin Portal Link) या अधिकृत संकेतस्थळावरून झाली. 45वर्षांवरील वयोगटातील व्यक्ती, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे आणि मागील वर्षभरात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अशा जवळपास 20 कोमोर्बिड निकषांमध्ये मोडणाऱ्या व्यक्ती या लसीकरणाच्या टप्प्यासाठी पात्र आहेत.
कोरोना लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रियेतील काही महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे :
- http://cowin.gov.in (CoWin Portal Link) या संकेतस्थळावर भेट द्या.
- इथं तुमचा वैध मोबाईल क्रमांक टाईप करा. पुढं “Get OTP” या बटणावर क्लिक करा.
- एका एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी देण्यात येईल.
- ओटीपी तिथं दिलेल्या ठिकाणी क्लिक करुन “Verify” या बटणावर क्लिक करा.
- ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही “registration of Vaccination” अर्थात लसीकरणासाठीच्या नोंदणीच्या पेजवर पोहोचाल.
- इथे आवश्यक ती माहिती द्या.
सर्व माहिती दिल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर “Register” या बटणावर क्लिक करा. ज्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा एक मेसेज येईल. Account details page वर असणाऱ्या कॅलेंडर या बटणावर क्लिक करुन किंवा “Schedule Appointment” वर क्लिक करुन लसीकरणासाठीची तारीख मिळवता येईल. इथं “Book Appointment for Vaccination page” असाही पर्याय दिसेल. ज्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या केंद्राची आणि वेळेची निवड करत लसीकरणासाठीचं हे पुढचं पाऊल टाकणं शक्य होईल.