रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपल्या जिओ फोन युजर्संसाठी ५ नवीन प्लान लाँच केले आहेत. २२ रुपयांपासून सुरूवाती किंमती सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा आणि २८ दिवसांची वैधता दिली जात आहे. लाँच झालेल्या या प्लानमध्ये कंपनी जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा ऑफर करीत आहे. जाणून घ्या या ऑल इन वन प्लान्स संबंधी.
२२ रुपयांचा प्लान
२२ रुपयांच्या किंमतीतील या प्लानमध्ये कंपनी एकूण २ जीबी डेटा देते. यात कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा दिली आहे. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये जिओ सिनेमा आणि जिओ सिक्योरिटी सोबत न्यूज अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
५२ रुपयांचा प्लान
जिओ फोन युजर्संसाठी ५२ रुपयांचा प्लान असून या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात एकूण ६ जीबी डेटा ऑफर केला जातो. डेटा पॅक मध्ये कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट दिले जात नाही. प्लानच्या सब्सक्रायबर्सला जिओ टीव्ही सह जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ न्यूजचे फ्री सब्सक्रिप्सन दिले जाते.
७२ रुपयांचा प्लान
रनिंग प्लानमध्ये मिळणाऱ्या डेटामध्ये हा प्लान बेस्ट आहे. या प्लानमध्ये ०.५ जीबी (५०० एमबी) डेटा दिला जातो. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps होते. या प्लानमध्ये कंपनी जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.
१०२ रुपयांचा प्लान
२८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये फ्री कॉलिंग आणि डेली फ्री एसएमएसची सुविधा मिळत नाही. बाकी प्लान्स प्रमाणे जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.
१५२ रुपयाचा प्लान
जिओ फोनच्या या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा ऑफर करते. प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळत नाही. प्लानमध्ये मिळणाऱ्या या अतिरिक्त बेनिफिट्समध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ न्यूजचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.