अकोला(दीपक गवई)—उदयोन्मुख पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर उतरुन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अकोला शाखेच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित वेबीनार प्रसंगी बोलत होते.बुवाबाजीविरोधी संघर्ष विभाग कार्यवाह पी.टी.इंगळे अध्यक्षस्थानी होते.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘वैज्ञानिक दृष्टीकोन व आजचा विद्यार्थी’ या विषयावर मंथन करुन विद्यार्थ्यांमध्ये राबवायच्या विज्ञन विषयक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.विज्ञान प्रचार प्रसारासाठी धडपडणारे कार्यकर्ते,शिक्षक,विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन वआभारप्रदर्शन गजानन ढाले यांनी केले.’ विज्ञानाने माणुस चंद्रावर गेला ‘ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.