• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी ४०० कोटी

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी ४०० कोटी
14
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या 400 कोटी रुपयांच्या खर्चास रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टप्पा- 1 व 2 स्वरूपात काम हाती घेण्याबाबत निश्चिती करून काम हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. टप्पा-1 मध्ये 250 तर टप्पा-2 मध्ये 150 कोटी रुपये असे 400 कोटी अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला आहे. सदर प्रकल्पाच्या टप्पा 1 मध्ये सर्व इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असून, यामध्ये स्थापत्य, विद्युत, इमारतीच्या अंतर्गत व बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामांचा समावेश आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

टप्पा-2 मध्ये तंत्रज्ञान, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे. चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी इत्यादी कामे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना हाती घ्यावयाचे प्रस्तावित आहे. 400 कोटी रकमेचा खर्च सुरुवातीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.

प्रशासकांना मुदतवाढ

कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांना 30 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणूका घेणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासकांना मुदतवाढ देण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार सरकारने प्रशासकांना मुदतवाढ दिली.

मत्स्य विद्यापीठातील शिक्षकांना सातवा आयोग

पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयांतील शिक्षकांना 1 जानेवारी 2016 कालावधीपासून सातवा वेतन आयोग लागू. याचा 388 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना लाभ होईल. यासाठी 30 कोटी रुपये एवढा निधी देण्यात येईल.

नांदेडमध्ये नर्सिंग कॉलेज

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 50 विद्यार्थी क्षमता असलेल्या शासकीय परिचर्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 16 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

बालसंगोपन योजनेच्या अनुदानात वाढ

बालसंगोपन योजनेअंतर्गत बालकांचे संगोपन करणार्‍या पालकांना प्रति बालक दरमहा देण्यात येणार्‍या अनुदानात 425 वरून 1100 रुपये इतकी वाढ करण्यास आली आहे.

Tags: Bala saheb Thakreबाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक
Previous Post

Online Driving Licence : आता ड्रायविंग लायसन्स बनवणं झाले सोपे, जाणून घ्या ते कसे

Next Post

तेल्हारा विकास मंच शाखा – जिजामाता नगर व सुपीनाथ नगर च्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
तेल्हारा विकास मंच शाखा – जिजामाता नगर व सुपीनाथ नगर च्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

तेल्हारा विकास मंच शाखा - जिजामाता नगर व सुपीनाथ नगर च्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

तळेगाव बाजार येथे जनावरांसह दोन गोठे जळून खाक,शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

तळेगाव बाजार येथे जनावरांसह दोन गोठे जळून खाक,शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.