तेल्हारा(प्रतिनिधी)- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोकजागर मंच कडून सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.
नेहमीच सामाजिक उपक्रम राबवनाऱ्या लोकजागर मंचाने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा बसस्थानक परिसरातील जेसीबी द्वारे काटेरी झुडपे काढून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच जिल्हयात कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्याने एक सामाजिक दायित्व म्हणून जनजागृती पर फलक संपूर्ण शहरात लावून नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अशा आगळ्यावेगळ्या प्रकारे जयंती साजरी करण्यात आल्याने शहरातील नागरिकांमध्ये लोकजागरने ऐक वेगळीच छाप सोडली यावेळी लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ गावंडे, तेल्हारा पोलीस स्टेशन चे ठानेदार दिनेश शेळके साहेब व तेल्हारा आगार प्रमुख वानरे साहेब ,गोपालभाऊ जळमकार,दिलीप पिवाल, अमोल जवंजाळ ,राजेश काटे,निलेश जवकार, दिपक अहेरकर, चंद्रकांत मोरे गुरुदेव ईसमोरे, राजेश ताथोड,सागर गळस्कार, विनोद सगणे, सुरेश जवकार, रवी ईंगळे, विठ्ठल राऊत, प्रज्वल जामोदे, शुभम सोनोने, तुषार ठाकुर , शिवा दिंडोकार,गजानन मते प्रदीप कुचके, विनोद शित्रे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.