अकोला(दिपक गवई)– जगतगुरु संत सेवालाल महाराज यांची २८२ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पंचायत समिती सभापती यांच्या दालनात सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते तथा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पंचायत समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ, पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, उपसभापती अनुसया राठोड, रोहिदास राठोड, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे,रतन आडे,ईमरान खान, अमोल जामनिक,रक्षक जाधव,रोहन कांबळे आदी उपस्थित होते.