अकोला – शासनाच्या महत्वाकांक्षी स्वामीत्व योजनेअंर्तगत गावठाण जमाबंदी प्रकल्प जिल्ह्याचे यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली ड्रोनव्दारे गावठाण भूमापन योजनेची जिल्हा संनित्रयण व अमंलबजावणी समितीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली.
यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपजिल्हाधिकारी महसुल गजानन सुरंजे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर ए शेळके, नगर रचनाकार विभागाचे गावंडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विभागाचे विजय चव्हाण, योगेश कुलकर्णी आदि उपस्थीत होते.
गावठाण जमाबंदी प्रकल्प अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यापासुन सुरवात झाली असुन जिल्ह्यातील 863 गावांचे गावठाणाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण करण्याचे निश्चीत केले असुन मुर्तीजापुर तालुक्यातील 135 गावांचे ड्रोनव्दारे मोजणीचे काम पुर्ण करण्यात आले आहे, तेल्हारा तालुक्यातील 81 गावांचे गावठाणाचे ड्रोनव्दारे मोजणी काम सुरु असुन ते 13 फेब्रुवारीपर्यत पुर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्वरीत तालुक्यातील गावांतील गावठाण मोजणीचे काम ड्रोनव्दारे एप्रिल 2021 पर्यत पुर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
गावठाण जमाबंदी योजना ड्रोनव्दारे पुर्ण करण्यात येणार असुन ड्रोन उडानाच्या अगोदरच्या दिवशी 10 से.मी.जाडीच्या चुनाच्या रेषाव्दारे मिळकतीचे सिमांकन करणे आवश्यक आहे. योजनेत जनतेने आपल्या खाजगी मिळकतीचे सिमांकन ग्रामसेवक व भुमापक यांच्या मार्गदर्शानात पुर्ण करणे आवश्यक आहे. त्याकरीता सर्व नागरीकांनी या योजनेत सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. शासकीय मिळकती, रस्ते, सार्वजनीक मिळकती, ग्राम पंचायत मिळकतीचे सिमांकनचे काम ग्रामसेवक यांनी भुमापक यांच्या मदतीने पुर्ण करण्याचे सुचना देण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत जनतेस प्रत्येक मिळकतीच्या सिमा निश्चित होवुन नकाशा तयार करुन मिळकतीचे नेमके क्षेत्र कायम केले जाईल. मालक्की हक्काबाबत कायदेशीर हक्काचा अधिकार मिळकत पत्रिका तयार केली जाईल, ग्रामस्थांच्या नागरी हक्काचे संरक्षण केल्या जाईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे कर्ज घेणे सोईचे होणार असून गावातील मालक्की हक्क व हद्दीबाबतचे वाद कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच मिळकत पत्रिका अभिलेख तयार झाल्याने ग्रामस्थाच्या मिळकतीचे मुल्य वाढुन बाजारात तरलता येईल. ही योजना जनतेकरीता अंत्यत महत्वपुर्ण असल्याने व ग्रामीण भागाचा कायापालट होणार आहे. जनतेला योजनेत सक्रीय सहभाग घेवुन योजना यशस्वी करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आवाहन केले.