मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, ते आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शाळा देखील टप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. मात्र राज्यातील विद्यापीठे कधी सुरु होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. राज्यातील विद्यापीठे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्यात असून SOP ठरवून टप्याटप्याने महाविद्यालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.काल सर्व राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत बैठक झाली. सर्व विद्यापीठचे कुलगुरू विद्यापीठ महाविद्यालय सुरु करण्याबाबत सकारात्मक आहेत. विद्यापीठं सुरू करत असताना SOP तयार करण्याचे काम सुरु आहे. विद्यापीठ आणि राज्य शासन मिळून SOP ठरवतील, असं उदय सामंत यांनी सांगितलं.वसतिगृह सुरु करण्याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे. कारण अजूनही काही वसतिगृह क्वॉरंटाईन सेंटर आहेत. ते सुद्धा टप्प्याटप्प्याने सुरु केली जाणार आहेत.
आता डिजास्टर मॅनेजमेन्टसोबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल आणि त्यानंतर तातडीने कॉलेज सुरु करण्याबबत निर्णय होईल. कॉलेज सुरु होण्याची तारीख 2 ते 4 दिवसात जाहीर करु, असं उदय सामंत यांनी सांगितलं.कुलगुरुचं म्हणणं आहे काही ठिकणी ऑनलाईन तर काही ठिकाणी ऑफलाईन वर्ग सुरु करावे. मात्र आम्ही सांगितलं की विद्यापीठांनी SOP तयार कराव्यात, कारण त्या यूजीसी गाईडलाइन्सनुसार होईल. राज्यपाल , कुलगुरु यांच्यासोबत चर्चा करताना सांगितलं की कॉलेज सुरु करताना 100 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थित कॉलेज सुरु करता येणार नाही, शासन असा निर्णय घेणार नाही. SOP ठरवून विद्यार्थी उपस्थिती पाहून टप्प्याटप्प्याने कसे कॉलेज सुरु करायचे याबाबत निर्णय घेऊ. कॉलेज सुरू करण्याबबत निर्णय झाला आहे, फक्त कागदावर येणे बाकी आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.