नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरुर आणि सहा पत्रकारांवर पोलिसांनी देशद्रोह, गुन्हेगारी षडयंत्र आणि जाणीवपूर्वक घृणा पसरवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवला आहे. प्रजासत्ताक दिनाला झालेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी शशी थरुर आणि सहा पत्रकारांवर गुन्हे दाखल केले आहेत. याचबरोबर या सर्वांवर मध्य प्रेदेशातही दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
नोएडाच्या पोलिस ठाण्यात दिल्ली शहराजवळ राहणाऱ्या ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत शशी थरुर आणि पत्रकारांनी डिजीटल ब्रॉडकास्ट आणि सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान एका शेतकऱ्याला गोळी मारल्याचा दावा केला होता. यामुळे लाल किल्ल्यावर हिंसाचार भडकला असा अरोप या तक्रारीत करण्यात आली आहे. या एफआयआरमध्ये मृणाल पांडे, राजदीप सरदेसाई, विनोद जोस, जाफर आगा, परेश नाथ आणि अनंत नाथ या पत्रकारांचा समावेश आहे.
२६ जानेवारीला हजारो शेतकरी आणि पोलिसांमध्ये ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाला होता. अनेक आंदोलक लाल किल्यात घुतले होते आणि पोलिसांवर हल्ला केला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पूर्वी अभिनेता दीप सिंधू, गँगस्टर लखा सिद्धाना यांचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट केले होते.
दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर गाझियाबाद पोलिसांनी शेतकऱ्यांना घरी परत जाण्याचे आवाहन केले होते. पण, शेतकऱ्यांनी नकार दिला. त्यांचे नेते राकेश टिकौत यांनी आपण गोळ्याही खाण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असलेल्या टिकरी आणि सिंघू बॉर्डवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.