अकोला(प्रतिनिधी)- अकोला शहरातील मेलोडीज ऑफ अकोला ह्या संगीत प्रेमी नागरिकांच्या समूहाने 72 वा प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला, सकाळी 7:00 वा पासून ते 12:00 वा पर्यंत सतत देशभक्तीपर गीत गायन करून वातावरण देशभक्ती ने भारावून टाकले.
अकोला शहरातील संगीतप्रेमी व्यापारी, डॉक्टर, प्राध्यापक, चार्टर्ड आकाऊंटंट, अधिकारी ह्यांनी एकत्र येऊन आपला मेलोडीज ऑफ अकोला हा ग्रुप तयार केला असून वेळवेळी हा समूह गीत गायनाच्या निमित्ताने एकत्र येत असतो व कारवोके पद्धतीचा वापर करून आपली संगीतकला सादर करीत असतो, ह्या समूहाच्या एखादया सदस्याचा वाढदिवस असो की विवाहदीवस, कोणत्या ना कोणत्या कारणाने एकत्र येऊन प्रत्येक सदस्य आपली कला सादर करीत असतो, 26 जानेवारी ला वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ह्या समूहाने ठरवून स्थानिक सिविल लाईन चौकात स्टेज उभारून सकाळी 7 ते 12 वा पर्यंत सतत 5 तास समूहाच्या सदस्यांनी देशभक्तीपर गीते गाऊन अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिवस साजरा केला, चौकात कोणतीही गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा होणार नाही व कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला.
उपजिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी ह्यांनी केले गायन
ह्या कार्यक्रमाचे आकर्षण व वैशिष्ट्य म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते, दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून आपल्या ह्या समूहाच्या कार्यक्रमात भाग घेऊन देशभक्ती पर गीते सादर केली ज्याला उपस्थितांनी चांगली दाद दिली।