मुंबई : केंद्राने केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्यांपासून आंदोलन छेडलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने जमा झाले आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांनीही पाठिंबा दिलेला आहे. शेतकरी मोर्चा राजभवनाकडे जात असताना मेट्रो चौकात पोलिसांनी मोर्चा थांबविला आहे. त्यामुळे भाई जगताप, मेधा पाटकर, सचिन सावंत, नसीम खान, अशोक ढवळे, अशा २३ जणांचे शिष्टमंडळ पोलिस व्हॅनमधून राजभवनाकडे रवाना होत आहे.
दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. हा मोर्चा शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.