• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘अंडी,चिकन खाऊ चला!’ अकोल्यातून कृतिशील जनजागृती

Team by Team
January 20, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
79 1
0
‘अंडी,चिकन खाऊ चला!’ अकोल्यातून कृतिशील जनजागृती
12
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाबाबत जनमानस शंकाग्रस्त असतांना, लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष चिकन व अंडी खाऊन कृतिशील जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच पत्रकार व समाजातील विविध घटकांतून लोक सहभागी झाले.

येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या वतीने या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार,  पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. तुषार बावने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने, अमोल पाटील व राजरत्न वानखडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद थोरात यांनी केले. बर्ड फ्ल्यू मुळे जनमानसात निर्माण झालेली भिती पाहता चिकन व अंडी  यांचे सेवन करण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र शिजवून खालेल्ल्या मांसातून हा आजार होत नाही. इतकेच नव्हे तर हा फक्त पक्षांना होणारा आजार आहे, तो माणसांना झाल्याची एकही नोंद भारतात नाही. अपसमज दूर करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बावने म्हणाले की,  व्यावसायिक पद्धतीने होत असलेल्या कुक्कुट पालनात पक्षी ठेवण्याच्या जागांचे वारंवार निर्जंतुकीकरण केले जात असते, परिसराची स्वच्छता राखली जाते. त्यांचा अन्य पक्षांशी संपर्क येत नाही. तेव्हा अंडी व चिकन खाणे हे सुरक्षित आहे.

डॉ. भिकाने यांनी सांगितले की, स्थलांतरीत पक्षी असे विषाणू आणत असतात. या पक्षांशी पाणी, विष्ठा इ. च्या  माध्यमातून संपर्कात येतात त्यांना या विषाणूची लागण होते. मात्र असे कुक्कुट पालन केलेले पक्षी हे कोणाच्याही संपर्कात येत नसतात. त्यामुळे त्यांचे मांस व अंडी खाणे हे निर्धोक आहे. परसबागेत कोंबडी पालन करणाऱ्या पक्षीपालकांनी आपल्या पक्षांची अधिक निगा राखावी,असे त्यांनी सांगितले.

उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी सांगितले की,  चिकन व अंडी हे प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहेत. शरिराची रोग प्रतिकार शक्ती ही त्यामुळे वाढत असते. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कृषि प्रधान असून कुक्कुट पालन व दुग्धव्यवसाय हे  त्याला पूरक व्यवसाय आहेत. निव्वळ गैरसमजापोटी या व्यवसायांवर अरिष्ट येणे हे योग्य नाही. तेव्हा हा गैरसमज दूर करण्यासाठी आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की,  बर्ड फ्ल्यू या पक्षांमध्ये होणाऱ्या आजाराबाबत माणसांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आयोजित हा कृतिशिल प्रबोधनाचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. लोकांनी न घाबरता चिकन व अंडी खावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.  प्रवीण बनकर यांनी केले तर डॉ. मंगेश वड्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी चिकन व अंडी यांच्या डिशचा आस्वाद घेऊन  चिकन व अंडी खाने सुरक्षित असल्याचा संदेश दिला.

Tags: Bird flue awarenessबर्ड फ्ल्यूबर्ड फ्ल्यू जनजागृती
Previous Post

अकोल्यातील पत्रकार उमेश अलोने ‘डॉ. पंजाबराव देशमुख समाजवीर पुरस्काराने’सन्मानित

Next Post

रक्ताल्पता मुक्त अकोला जिल्हा : पोषणयुक्त आहाराबाबत जनजागृती करा- जिल्हाधिकारी पापळकर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Collector Akola

रक्ताल्पता मुक्त अकोला जिल्हा : पोषणयुक्त आहाराबाबत जनजागृती करा- जिल्हाधिकारी पापळकर

marriage

अक्षता पडण्यापूर्वीच प्रियकर धडकला अन् नववधू भोवळ येऊन पडली...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.