• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

…तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू, संजय राऊतांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
80 1
0
sanjay raut
15
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो.काही झाले तरी राजीनामा घ्या,असे ते म्हणतात.असे जर म्हणायला गेले तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू.दिल्लीत जे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे ते राजीनामा मागण्यासारखेच आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बडे नेते नवाब मलिक आणि धनंजय मुंडे हे वेगेवगेळ्या प्रकरणांमुळे चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. राजीनामा मागणाऱ्या भाजप नेत्यांना यावेळी संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले.

संजय राऊत हे शुक्रवारी आपल्या परिवारासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले होते.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजकारणात असे आरोप विरोधी पक्ष करत असतो.त्यांना ते करत राहूद्या.असे कितीही आरोप केले तरी हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. विरोधी पक्ष राजीनाम्याची मागणी करत आहेत. शिवाय शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले, राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झाले तरी राजीनामा घ्या, असे ते म्हणतात. असे जर म्हणायला गेले तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू. दिल्लीत जे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे ते राजीनामा मागण्यासारखेच आहे,असा टोला त्यांनी लगावला.तसेच प्रत्येक आरोपाला उत्तर दिले पाहिजे असे घटनेत लिहले नाही, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रतिमेला याने धक्का लागलेला नाही, असे स्पष्ट केले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

दरम्यान,संजय राऊत आज आपल्या कुटुंबासह शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने आणखी एका नव्या चर्चेला उधाण आले होते. मात्र ही एक कौटुंबिक भेट असल्याचे समजते. संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी सहकुटुंब पवारांच्या भेटीसाठी गेले होते, अशी माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील बडे नेते अनेक प्रकरणांमुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने भाजप आणि शिवसेना आमने-सामने आले होते. हे प्रकरण शांत होत नाही तेच धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कराचे आरोप झाले आहेत. यासह नवाब मलिक यांच्या जावयावर ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले असून यापुढे आणि काय घडामोडी घडतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

Tags: संजय राऊत
Previous Post

“कायद्यासमोर ना मंत्री मोठा ना संत्री” गृहमंत्र्यांचे मोठे विधान

Next Post

मा. सुजातजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित चे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
Blood Donation balapur

मा. सुजातजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित चे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

Maratha maha sangh

मराठा महासंघ तेल्हारा तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर तालुकाध्यक्षपदी अंकुश सपकाळ यांची निवड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.