अकोला – सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी शासकीय कोट्यातील जागा अद्यापही रिक्त आहेत, त्यासाठी ऑनलाईन विशेष फेरीचे आयोजन करुन भरण्यात येणार असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक यांनी कळविले आहे.
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. मात्र शासकीयि कोट्यातील जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यासाठी विशेष ऑनलाईन फेरी घेण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रक याप्रमाणे-
शासकीय कोट्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज दि. 11 ते 14 जानेवारी पर्यंत भरणे. पडताळणी अधिकाऱ्यांनी दि. 11 ते 15 जानेवारीपर्यंत प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगीन मधून प्रवेश घ्यावयाचे अध्यापक विद्यालय निश्चित करुन स्वतःचे प्रवेशपत्र दि. 11 ते 16 जानेवारीपर्यंत काढून घेणे. तर संबंधित अध्यापक विद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रांची पडताळणी करुन स्वताच्या लॉगीन मधून विद्यार्थ्यांना दि. 11 ते 20 जानेवारीपर्यंत ऑनलाईन ॲडमिट करण्याची प्रक्रिया करावी लागेल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करु शकतात. प्राथमिक शिक्षण पदविकाकरीता इयत्ता 12 वी उत्तीर्ण पात्रता आवश्यक.(खुला संवर्ग 49.5 टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 45.5 टक्के गुणांसह)
यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन ॲप्रुव्ह करुन घेतला आहे परंतु प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांच्या अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती मध्ये आहे तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन ॲप्रुव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वतःच्या लॉगिनमधुनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्यांने अध्यापक विद्यालयाची स्वतः निवड करुन लगेच प्रवेशपत्र स्वतःच्या ईमेल व लॉगिनमधून प्रिंट घ्यावयाची आहे. त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहुन प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश प्रक्रियेच्या या व्दितीय फेरीनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे राज्यस्तरीय डी.एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व संनियत्रण समिती, पुणे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.