तेल्हारा(प्रतिनिधी)- ज्यावेळी भारतीय समाजात स्त्रीचा जन्म नकोसा वाटे त्याच वेळी शिक्षणापासून आणि स्वातंत्र्य पासून दूर ठेवून परतंत्र आणि परावलंबी ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाई फुले यांचा जन्म जानेवारी इ.स 1831 रोजी झाला सावित्रीबाई यांनी समाजात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळावे यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले अश्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना तेल्हारा पोलिस स्टेशन येथे अभिवादन करण्यात आले यावेळी ठाणेदार दिनेश शेळके,सहाय्यक पोलीस निरीक्षक मालती कायटे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे व समस्त पोलीस कर्मचारी उपस्थित होते.