अकोला – नववर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ई- टपाल प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते रिमोट्द्वारे क्लिक करुन ही प्रणाली सुरु करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, नपा प्रशासन अधिकारी सुप्रिया तोलारे तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
यावेळी या प्रणालीबाबत जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी संदीप चिंचोले यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, या प्रणालीद्वारे जमा होणाऱ्या टपालाची पोहोच पावतीही अर्जदारास व पत्र देणारास मिळणार आहे. या पत्राला संबंधित विभागप्रमुख हे संबंधित कार्यासनापर्यंत पोहोचवून त्याचे ऑनलाईन ट्रॅकिंगही करु शकणार आहेत. लवकरच प्रत्येक विभागनिहाय या प्रणालीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन ही प्रणाली सर्व कार्यालयांत लागू केली जाईल,असे त्यांनी सांगितले.