• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अक्‍कलकोट ‘स्वामी’ दर्शनाचा मार्ग मोकळा, मंदिर भक्‍तांसाठी खुलं

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
82 1
0
अक्‍कलकोट ‘स्वामी’ दर्शनाचा मार्ग मोकळा, मंदिर भक्‍तांसाठी खुलं
13
SHARES
590
VIEWS
FBWhatsappTelegram

अक्कलकोट (जि. सोलापूर) : सध्या कोरोनाचे रूग्ण आटोक्यात आले असले तरी डिसेंबर महिन्यात रूग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली होती. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार 24 डिसेंबरपासून अक्‍कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र नूतन वर्षाच्यानिमित्ताने शुक्रवार 1 जानेवारीच्या पहाटेपासून मंदिर खुले झाल्याने भक्‍तांसाठी स्वामी दर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या 9 महिन्यांपासून बंद असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर दिवाळीच्या मुहूर्तावर उघडण्यात आले होते. त्यानंतर नाताळ व शासकीय सुट्टया, दत्त जयंती उत्सव, थर्टी फस्ट, व नूतन वर्षाचे स्वागत या पाश्वभूमीवर वटवृक्ष मंदीरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली असती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग बळावू नये यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 24 डिसेंबर 2020 ते 2 जानेवारी 2021 अखेर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

शिवाय या कालावधीत भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेशासाठी मनाई करण्यात आली होती. या आदेशास अनुसरून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्यासोबत मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांची 27 डिसेंबर रोजी चर्चा झाली. कोरोना संसर्ग मंदिरात होवू नये याकरिता मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था, मंदिर परिसरात सॅनिटायझर पुरवठा, मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन इत्यादी व्यवस्था दिवाळीपासून मंदिर उघडल्यानंतर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. शासनाच्या नियमांची अंमलबजावणी यापुढेही कायम राहणार असल्याचे मंदिर समितीच्यावतीने सांगण्यात आले. यामुळे नूतन वर्षाच्या मुहूर्तावर वटवृक्ष मंदिर भाविकांना स्वामी दर्शनाकरीता खुले करण्यात यावे अशी विनंती केली गेली. या विनंतीबाबत विचार विनिमय करून जिल्हाधिकारी यांनी 1 जानेवारी 2021 रोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर उघडण्याचे नवीन आदेश पारित केले. त्यामुळे 1 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांना स्वामी दर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अन्नछत्रासही प्रारंभ

शासनाच्या आदेशानुसार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे 1 जानेवारी 2021 पासून सुरु होणार असल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली. दरम्यान, न्यासातील अन्नदानाची सेवा (महाप्रसाद) आणि निवासी व्यवस्था कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद होते. हा निर्णय शासनाने श्री दत्त जयंतीनिमित्त घेतला होता. शासनाने 1 जानेवारी 2021 पासून अन्नछत्र सुरु करण्याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.

Tags: स्वामी समर्थ मंदिर
Previous Post

केंद्र व राज्य सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही; ते फक्त आदेश काढत आहे : प्रकाश आंबेडकर

Next Post

भीमा कोरेगाव विजयस्तंभ, शौर्याची निरंतर प्रेरणा-भिमराव परघरमोल

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
भीमा कोरेगाव विजयस्तंभ, शौर्याची निरंतर प्रेरणा-भिमराव परघरमोल

भीमा कोरेगाव विजयस्तंभ, शौर्याची निरंतर प्रेरणा-भिमराव परघरमोल

जिल्हाधिकारी कार्यालयात ई- टपाल प्रणालीचा प्रारंभ

जिल्हाधिकारी कार्यालयात ई- टपाल प्रणालीचा प्रारंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.