तेल्हारा दि:- आठवडी बाजार ते संभाजी चौक ते माळेगाव नाका या मार्गावरील जड वाहतुकी मुळे आज २९ डिसेंबरला रस्त्यावर एका लहान मुलीचा अपघात होता होता टळला असता नागरिकांनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन ठाणेदार दिनेश शेळके यांना निवेदन देऊन सदर मार्गावरील जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली.
श्री शिवाजी चौक ते संभाजी चौक ते माळेगाव नाका या अरुंद मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून जळ वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सदर जड वाहनांमुळे त्रास होत असून यामुळे अनेक अनेक लहान मोठे अपघात नेहमीच होत असून त्यामुळे या मार्गावरील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे तसेच या मार्गावरील राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुले नेहमीच खेळत असतात जड वाहनामुळे एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आज २९ डिसेंबर रोजी संभाजी चौकामध्ये जड वाहनांमुळे लहान मुलीचा अपघात होता होता टळला तरी सदर मार्गावर जड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली जड वाहतूक बंद न झाल्यास नागरिकांना कायदा हातात घेऊन स्वतःजळ जड वाहतूक बंद करावी लागेल याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे नागरिकांनी आज ठाणेदार पोलिस स्टेशन तेल्हारा यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे या वेळी अमोल आकोटकर, रामभाऊ फाटकर ,मंगेश ठाकरे, स्वप्निल सुरे, महेश ठाकरे , राहुल झापर्डे, राम खारोडे, सुनिल फाटकर, राजेश मामन कार ,संतोष मानकर , दीपक टिकार , शंकरराव सुरे , गणेश लासूर का र , किशोर सायानी, विठ्ठल मामनकार , श्याम खारोडे , प्रकाश वासनकर , विशाल सोनटक्के , विठ्ठल बनकर, महेश हागे , गिरीश घोडेश्वर आकाश फाटकर शुभम सोनटक्के, तेजस बाभुळकर, शुभम टिकार , प्रकाश ज्ञानेश्वर आवारे विलास देशमुख ,सागर सोनटक्के ,शुभम सूरे , विठ्ठल मामनकर ,प्रणव मामनकर , शिवम फाटे इत्यादी नागरिक उपस्थित होते.
::::::;;; ;;:::;;;;;;;;;;;;;
आठवडे बाजार ते शिवाजी चौक ते संभाजी चौक ते माळेगाव नाका पर्यंत च्या रस्त्यावर जी जड वाहतूक होत आहे त्या वाहनावर कारवाई करण्यात येईल
दिनेश शेळके
ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा