अकोट(देवानंद खिरकर) – विश्वरूप बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे मार्फत अकोला जिल्ह्यातील आदिवासी भागातील महिलांना ब्लॅंकेट व साड्यांचे वाटप करन्यात आले आहे.
तसेच या गावांमधील वयोवृद्धांना कपडे व ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.या वेळी उपस्थित अकोली जहांगीर येथील विश्वरूप बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पंकज ढेमरे, रमेश ढेमरे, निखिल ढेमरे, सलीम सय्यद,गजानन जायले.
तसेच या वेळी श्री संजय गयधर,श्री ईश्वरसिंग,श्री केशव श्री मारुती व इतर गावकरी मंडळी उपस्थित होती.
या पुढे विश्वरूप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जनजागृती,रोड सेफ्टी व पर्यावरण विषयक जागृती या विषयवार संपूर्ण अकोला जिल्यात काम करणार आहे.असे मनोगत विश्वरूप बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री पंकज रमेश ढेमरे यांनी व्यक्त केले आहे.