तेल्हारा- आज दुपारी तेल्हारा शहरातील बस स्टँड ते साई मंदिर दरम्यान दुचाकी व बसचा अपघात झाला यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे आहे की आज दुपारी 3 वाजेच्या दरम्यान अकोट ते तेल्हारा बस क्र एम एच ४० एन ८०१३ ही अकोट वरून तेल्हारा बसस्थानक येथे जात असताना साई मंदिर जवळ एम एच ३० बी एम १९७५ क्रमांकाची दुचाकी बसवर जाऊन आदळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीस्वार कान्हेरी गवळी येथील असल्याचे बोलले जात आहे.तसेच दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेत असल्याचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांचे म्हणणे आहे.घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश शेळके यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व जखमीला अकोला येथे पाठवण्यात आले आहे.आद्यपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
न प प्रशासनाचा वेळकाढूपणा
शहरात साई मंदिर ते बस स्थानक हा मोठा वर्दळीचा मार्ग असून यामार्गावर गटारीचे काम सुरू असून ठेकदाराचा मनमानी कारभार या मार्गावर सुरू आहे.तसेच न प प्रशासनाचे या कामावर दुर्लक्ष होत असून कुठलाही कर्मचारी या मार्गावर दिसत नाही गटारीसाठी खोदकाम करण्यात आले असून मुख्य रस्त्यावर मातीचा ढिगारा लावल्याने संपूर्ण रोड हा मातीचा झाला आहे यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते या मार्गावरील वाहनधारकां सह या भागातील नागरिक धुळीला परेशान झाले आहे.दुचाकी स्वरांना धुळीमुळे समोरचे दिसत नसल्याने अनेक अपघात या मार्गावर होत आहेत.आमच्या प्रतिनिधीने दोन दिवस अगोदर याबाबत न प मुख्याधिकारी याना याबाबत अवगत केले होते त्यानुसार न प कर्मचारी याना याबाबत सूचना देऊन समस्या निकाली काढण्याचे सांगितले होते मात्र ढिम्म असे कर्मचारी अन पदाधिकारी शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असमर्थ दिसत आहे.