अकोला – दिल्ली येथे संपुर्ण देशभरातील शेतकऱ्यांनी “न भुतो न भविष्य” असे आंदोलन केल्या जात आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात शेती संबंधी तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत संख्याबळाच्या आधारावर मंजूर करुन घेतले. या नविन विधेयकामुळे भारतीय शेतकरी अक्षरक्ष: नागावला जाणार असुन तो देशोधडीला लागणार आहे. जागतीकीकरण आणि त्यामागुन अपरिहार्यपणे येणाऱ्या खाजगीकरणातुन शेतकऱ्यांचा शेतीमाल कवडी मोलाने विकत घेण्याची मुभा व त्याच बरोबर शेतकऱ्यांची जमीन गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नविन धोरणात आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा आहे त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडी वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक दिवशीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, महिला प्रदेश महासचिव सौ. अरूंधतीताई शिरसाट, जि.प अध्यक्ष सौ. प्रतिभाताई भोजने, सौ. पुष्पाताई इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, दिपक गवई, गजानन गवई, सौ. प्रतिभा अवचार, जि. प. उपाध्यक्ष सौ. सावित्राबाई राठोड, जि. प. सभापती आकाश शिरसाट, सौ. शोभाताई शेळके, सरलाताई उपर्वट भोसरी पुणे अध्यक्ष, वंदनाताई वासनिक, सौ. मंतोष मोहोळ, विजय तायडे, पुरूषोत्तम अहिर, जि.प.सभापती पंजाबराव वडाळ, सुभाष रौंदळे, विकास सदांशिव, जिवण डिगे, संतोष गवई, ज्ञानेश्वर सुलताने, संजय बावने, रामभाऊ नारायणराव गव्हाणकर, आकाश गवई, आकाश शिरसाट, कलीमभाई, अशोक दारोकार, नितीन सपकाळ, सैय्यद जानीभाई, रामा तायडे, सुरेंद्र तेलगोटे, मनोहर पंजवाणी, गजानन दांडगे, संगीता खंडारे, शेख साबीर, किशोर तेलगोटे, दादाराव पवार, भारत निकोशे, नितेश किर्तक, देवानंद तायडे, शंकर इंगळे, संदिप पळसपगार, महेंद्र तायडे, आशिष मांगुळकर, शरद इंगोले, बबन कांबळे, रमेश अकोटकार, सुनिल इंगळे, श्रीकांत ढगेकर, संजय निलखन, मधुकर गोपनारायण, गजानन लांडे, आकाश गवई, शंकरराव इंगोले, पार्वताबाई लहाने, सरलाताई मेश्राम, संजय नाईक, अमोल जामनिक, अजय अरखराव, प्रिती भगत, मनोहर बनसोड आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते पुणाजी खोडके यांनी दिली