• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

माजी आदिवासी विकस मंत्री आणि भाजप नेते विष्णू सावरा यांचे निधन

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
माजी आदिवासी विकस मंत्री आणि भाजप नेते विष्णू सावरा यांचे निधन
12
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि भाजपचे नेते विष्णू सावरा ( vishnu savara ) यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांना दीर्घ आजारावरील उपचारासाठी कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सावरा हे दीर्घ आजाराने त्रस्त होते. ( Former minister vishnu savara passed away ) त्यांच्यावर अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कार त्यांच्या पालघर येथील मूळ गावी वडा येथे आज (दि. १०) करण्यात येणार आहेत.

सावरा हे राजकारणात येण्यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. पण, १९८० मध्ये ते आपली नोकरी सोडून भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ता बनले. त्यानंतर ते विधानसभा लढवत सलग आपल्या मतदार संघातून सलग ६ वेळा निवडून आले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्रालय सांभाळले होते. याचबरोबर त्यांनी शिवसेना – भाजप युतीच्या पहिल्या सरकारमध्येही काही महिने मंत्रीपद सांभाळले होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी ‘श्री विष्णू सावरा यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मितभाषी, संवेदनशील व कर्तव्यदक्ष व्यक्तित्व असलेले सावरा जनसेवेसाठी सदैव तत्पर असत.

उत्तम संघटक असलेले सावरा विधानमंडळाचे अनुभवी सदस्य होते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले होते. त्यांच्या निधनामुळे आदिवासींच्या विकासासाठी आत्यंतिक तळमळ असणार्‍या जीवनाचा अस्त झाला आहे. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवतो.’ असे आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

राज्यपालांबरोबरच राज्याचे विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( devendra fadanvis ) यांनीही शोकसंदेश दिला. त्यांनी ‘भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री विष्णू सावरा यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपला आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील.’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Tags: भाजप नेते विष्णू सावरा
Previous Post

अकोला पोलीस दलातील कामकाजाचे मूल्यांकनामध्ये अकोट ग्रामिण व शहर पोलीसाची सरशी..!

Next Post

पाच मुलांच्या आईवर १७ जणांनी केला सामुहिक बलात्कार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
rape

पाच मुलांच्या आईवर १७ जणांनी केला सामुहिक बलात्कार

भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगा महाभरती; दहावी बारावी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगा महाभरती; दहावी बारावी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.