अकोला – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन . यानिमित्ताने जुने शहर स्तिथ भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कॉम्रेड रमेश गायकवाड हार पुष्प अर्पण करत यांनी अभिवादन केलं. ‘बाबासाहेब हृदयाला भिडतात. माणूस दैवत्वाला पोहोचतो म्हणजे काय होतं याचं उदाहरण म्हणजे बाबासाहेब. त्यांना मी विनम्रतेने अभिवादन करतो,’ अशी प्रतिक्रिया कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी यावेळी दिली.
लाखो शोषित-पीडितांची लढाई लढणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. यादिवशी आंबेडकरांचे लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीत दाखल होत आपल्या सर्वात मोठ्या नायकाला अभिवादन करतात. महाराष्ट्रातील अनेक कम्युनिस्ट नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचं महत्त्व अधोरेखित करत त्यांना अभिवादन केलं आहे.
‘स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल,’ असं कॉम्रेड नयन गायकवाड यांनी म्हटलं आहे व उपस्थितांनी पुष्प अर्पण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जय भीम लाल सलाम जय भीम लाल सलाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अमर रहे असे गगन भेदी नारे कॉ. रमेश गायकवाड कॉ. नयन गायकवाड कॉ. महादेव पिलात्रे, कॉ. इंदुबाई पिलात्रे, कॉ. रामदास कॉ. एस. देशमुख कॉ. विद्याधर ढोरे, कॉ. कुरुमदास गायकवाड लावले असे आपल्या प्रसिद्ध पत्रकाव्दारे कॉ. रामदास ठाकरे कळवितात.!