तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा पालिकेवर चक्क मोकाट जनावरांचा मोर्चा घेऊन शेतकरी धडकल्याने शहरवासीयांना अनोखे आंदोलन पाहण्यास मिळाले.
सविस्तर वृत्त असे आहे की शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे असून यामुळे शहरात वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण तर होतोच मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरालगत असलेल्या शेतकऱ्यांना संपुर्ण रात्र जागी राहावं लागतं आहे.त्याला कारण म्हणजे मोकाट जनावरे आधीच शेतकरी वर्ग अस्मानी सुलतानी संकटांना सामोरे जाऊन मेटाकुटीस आला आहे तर शेतकऱ्यांसमोर आता नवीनच संकट आले आहे ते मोकाट जनावरे ही जनावरे रात्रीला आपला मोर्चा शहरालगतच्या शेतात वळवून शेतातील पिके फस्त करीत आहेत अशातच शेतकऱ्यांनी दि २९ नोव्हेंबर च्या रात्री १० ते १५ शेतकऱ्यांनी सदर मोकाट जनावरे शेतातून थेट पोलीस स्टेशन येथे आणले या ठिकाणी याबाबत लेखी तक्रार देऊन सदर जनावरे गेल्या दोन दिवसांपासून सांभाळून न प प्रशासनाला याबाबत सांगत आले मात्र कोणीही याबाबत दखल न घेतल्याने आज शेतकऱ्यांनी थेट मोकाट जनावरे पालिकेच्या दरवाज्याला बांधून आपला रोष व्यक्त केला यावेळी त्यांना काही काळ योग्य उत्तर न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.मात्र मुख्याधिकारी यांनी अश्वसन दिल्यानंतर शेतकरी ही मोकाट जनावरे परत घेऊन गेले.
*कोंडवाडा आहे मात्र लिलाव झाला नाही*
न प प्रशासनाचा कोंढवाडा हा महत्वाचा भाग असून शहरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून जनावर मालकांकडून दंड स्वरूपात कोंढवाड्याची वसुली करून न प ला आर्थिक लाभ होऊ शकतो मात्र न प प्रशासनाने कोंढवाडाचा लिलावच केला नसून त्यामुळे मोकाट जनावरे ठेवावी कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे.शेतकऱ्यांनी मोर्चा आणल्यानंतर मुख्याधिकरी यांनी आठ दिवसात निविदा काढून कोंढवाडा सुरू करण्याचे आश्वासन दिले.