• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ठाकरे सरकारच्या कामगिरीवर जनता समाधानी;मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पसंती

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
मुख्यमंत्री
12
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकताच आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असून,त्या पार्श्वभूमीवर ‘द स्ट्रेलेमा’ या संस्थेने ठाकरे सरकारच्या कामगिरीचे सर्वेक्षण केले आहे .११ ते २४ नोव्हेंबर दरम्यान केलेल्या या सर्वेक्षणात राज्यातील सर्वसामान्य जनतेला विविध मुद्द्यांवर,सरकारच्या कामगिरीवर प्रश्न विचारण्यात आले होते.त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगिरी समाधानकारण असल्याचे ५९ टक्के जनतेने म्हटले आहे.तर भविष्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पाहायला आवडेल असेही मत नोंदविण्यात आले आहे.विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी असमाधानकारण असल्याचे मत ५३ टक्के व्यक्तींनी नोंदविले आहे.

हे सर्वेक्षण करताना राज्यातील सर्व विभागाचा यामध्ये विचार करण्यात आला आहे.१० हजार लोकांशी संवाद साधून काही निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचले असल्याचे स्ट्रेलेमा संस्थेचे अध्यक्ष सुशील शिंदे यांनी सांगितले आहे.हे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कामगिरी कशी वाटते ? या प्रश्नावर ५९ टक्के लोकांनी समाधानी असल्याचे तर ३२ टक्के लोकांनी समाधानी नसल्याचे मत नोंदविले आहे.९ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे मत नोंदविले आहे.गेल्या वर्षभरातील महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीविषयी आपण समाधानी आहात का ? या प्रश्नावर ६० टक्के व्यक्तींना समाधानी तर ३० टक्कांनी समाधानी नसल्याचे म्हटले आहे.तर या प्रश्नावर १० टक्के लोकांनी सांगता येत नाही असे मत नोंदविले आहे.महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी कशी वाटते ? या प्रश्नावर तब्बल ५३ टक्के लोकांनी समाधानी नसल्याचे मत मांडले आहे.तर फक्त ३४ टक्के लोकांनी फडणवीसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.१३ टक्के जनतेने सांगता येत नाही असे मत नोंदविले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

शांत आणि संयमी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भविष्यात मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असे मत २४ टक्के लोकांनी नोंदविले आहे.तर दुस-या क्रमांकांची पसंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आली आहे.२१ टक्के लोकांनी पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असे मत नोंदविले आहे.देवेंद्र फडणवीस यांना १९ तर बाळासाहेब थोरात यांना ५ टक्के लोकांनी भविष्यात मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असे मत नोंदविले आहे.गेल्या वर्षभरातील महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीविषयी आपण समाधानी आहात का ? या प्रश्नावर ६० टक्के लोकांनी समाधानी असल्याचे मत नोंदविले आहे. तर ३० टक्के लोकांनी समाधानी नसल्याचे मत नोंदविले आहे.गेल्या मार्च महिन्यापासून राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटात राज्य सरकारने केलेल्या कामाबाबतही या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला होता.कोरोनाचा प्रश्न सरकारने योग्य पद्धतीने हाताळला असे तुम्हाला वाटते का ? याचे ५९ टक्के लोकांनी हो तर १९ टक्के लोकांनी नाही असे मत नोदविले आहे.२२ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे मत मांडले आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेले शिक्षणाचे प्रश्न सरकारने योग्य पद्धतीने हाताळले का ? या प्रश्नावर ५३ टक्के लोकांनी हा प्रश्न सरकारने योग्य पध्दतीने हाताळला असल्याचे मत नोंदविले आहे.तर २७ टक्के लोकांनी नाही आणि २० टक्के लोकांनी सांगता येत नाही असे मत नोंदविले आहे. राज्यातील मंदिरे उघडण्यास उशीर झाल्याचे मत ३६ टक्के लोकांनी मांडले आहे.तर ४३ टक्के लोकांनी उशीर झाला नसल्याचे मत नोंदविले आहे.कोरोना काळात सरकारने शेतीविषयक प्रश्न योग्य पद्धतीने हाताळले का ? या प्रश्नावर ४८ टक्के लोकांनी हो तर २५ टक्के लोकांनी नाही असे उत्तर नोंदविले आहे.२७ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे मत नोंदविले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडत नाहीत अशी टीका होते आहे,त्यांनी कोरोना काळात बाहेर पडायला हवे होते का ? या प्रश्नावर ३८ टक्के लोकांनी बाहेर पडायला नको असे तर ३५ टक्के लोकांनी घरा बाहेर पडायला हवे होते असे मत नोंदविले आहे.मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार योग्य पद्धतीने हाताळत आहे का ? या प्रश्नावर ३७ टक्के लोकांनी हो तर २९ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे.आरे कारशेड हलवण्याचा निर्णय योग्य आहे का ? या प्रश्नावर ३६ टक्के लोकांनी हो उत्तर दिले आहे.तर २३ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे.विशेष म्हणजे ४१ टक्के लोकांनी सांगता येत नाही असे मत नोंदविले आहे.

Tags: ठाकरे सरकारमहाविकास आघाडी सरकारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत प्रवेश करणार

Next Post

बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये तर दहावीच्या परीक्षा मे महिन्यात होणार !

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र

बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये तर दहावीच्या परीक्षा मे महिन्यात होणार !

महात्मा फुले पुण्यतिथी तसेच 26/11 च्या शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी महात्मा फुले ब्रिगेड व संत सावता माळी युवक संघ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

महात्मा फुले पुण्यतिथी तसेच 26/11 च्या शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी महात्मा फुले ब्रिगेड व संत सावता माळी युवक संघ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.