मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्या शिवबंधन बांधणार आहेत.त्यांनतर आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत.
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिली होती.विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एका जागेसाठी शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली आहे.याला त्यांनी संमतीही दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या उद्या मंगळवारी दुपारी मातोश्रीवर होणा-या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी कंगना राणावत आणि शिवसेनेच्या वादात कंगनावर टीकास्त्र सोडत पलटवार केला होता.उद्या शिवसेना प्रवेशानंतर त्या एका पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडणार आहेत.