• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आज मध्यरात्रीपासून पंढरपुरात संचारबंदी

Team by Team
November 24, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
पंढरीत कार्तिकी वारीवेळी संचारबंदी
13
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

पंढरपूर : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या दहा गावांमध्ये आज मंगळवार, 24 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले. दरम्यान, पोलिसांनी मंदिर परिसर व चंद्रभागा नदीवरील घाट बॅरेकेडिंग करून बंद केले आहेत. पोलिस बंदोबस्तही वाढवला असून 1700 पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कार्तिक वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. वारी कालावधीत पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. सार्वजनिक हिताच्यादृष्टीने संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगावदुमाला, लक्ष्मीटाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण आणि कौठाळी या 10 ग्रामपंचायत हद्दीत साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार 144 अंतर्गत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

कार्तिक वारी कालावधीमध्ये परंपरेनुसार साजरे होणारे उत्सव यांना स्थानिक परिस्थितीनुरुप परवानगी देण्याचे अधिकारी राखून ठेवण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा संस्था भारतीय दंडसंहितेच्या कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि इतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

भाविकांनी पंढरपूरमध्ये येऊ नये म्हणून त्रिस्तरीय पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय नाक्यावर तपासणी करण्यात येत असून त्याचबरोबर पंढरपूर शहरातही जागोजागी पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. जेणेकरुन या त्रिस्तरीय नाकाबंदीतून कोणीही पंढरपुरात पोहचू शकणार नाही. याकरिता 1700 पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील सर्वच मार्ग बॅरेकेडिंग लावऊन बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर चंद्रभागा स्नानास बंदी घालण्यात आल्याने चंद्रभागा किनारी असलेले सर्वच घाट बॅरेकेडिंग करुन बंद केले आहेत. येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नदीपात्रातही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बससेवा वगळता इतर सर्व वाहतूक शहराबाहेर वळवण्यात आलेली आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा असेल तरच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, ऑनलाईन दर्शन बुकिंग पासधारकांना आज शुक्रवारी मुख दर्शनकरिता सोडण्यात येणार आहे. यानंतर मात्र 25 ते 27 पर्यंत मुख दर्शन बंद राहणार आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून संचारबंदी लागू होणार आहे.

यांना संचारबंदीत आहे सवलत

* अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणारी खासगी-सरकारी रुग्णालये, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी
* अ‍ॅम्ब्युलन्स सेवा आणि सारी, आयएलआय आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसंदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी, कर्मचारी.
* जीवनावश्यक सेवेतील आस्थापना
* मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडील पासधारक अधिकारी, कर्मचारी
* कर्तव्यावर असणारे महसूल, पोलिस, पाणीपुरवठा, अग्निशमक, विद्युतपुरवठा विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी.
* पोलिस बंदोबस्तासाठी भोजनालय, पाणीपुरवठा सुविधा पुरवणार्‍या यंत्रणा.

Tags: कार्तिक वारी
Previous Post

कोरोना लसीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर

Next Post

कोरोनाचा वाढता प्रकोप; पंतप्रधानांच्या आजच्या बैठकीत लॉकडाऊन, लसीबाबत चर्चा?

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
पंतप्रधान

कोरोनाचा वाढता प्रकोप; पंतप्रधानांच्या आजच्या बैठकीत लॉकडाऊन, लसीबाबत चर्चा?

महाराष्ट्रात येणार असाल तर सावधान..! कोरोना टेस्ट सक्तीची

महाराष्ट्रात येणार असाल तर सावधान..! कोरोना टेस्ट सक्तीची

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.