अकोट (देवानंद खिरकर) : गावातील नागरिकांमध्ये साथीची रोगांची नागरिकांत भीतीचे वातावरण,वडाळी देशमुख येथील मुख्य ग्रामपंचायतचे गेट व त्या ठिकाणावरून बाहेरगावाहून येणाऱ्या व जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा त्रिकूट बनलेला आहे याच ठिकाणी भलेमोठे सांडपाण्याचे गटार खड्ड्याचे स्वरूप घेऊन गेल्या दहा वर्षापासून इथं जिवंत वास्तव्यात आहे,दिवाळी सणासुदीच्या दिवसांमध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांची भरपूर संख्या असल्यामुळे याच खड्ड्यांमधून सर्वांना सलामी करत यावे व जावे लागते कितीतरी वेळा कित्येक जण पडले असून त्यांना व त्यांच्या मोटर सायकलींना नुकसान त्रास सहन करून यातना भोगाव्या लागत आहेत, याच बाजूला यवतकार प्लॉट हा गेल्या कित्येक वर्षापासून सांडपाण्याची नाल्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेली नाही त्यामुळे सांडपाणी सरळ आठवडी बाजाराच्या जागेमध्ये येथे येथील बाजार पूर्णपणे घाणीच्या साम्राज्यात भरतो तरीही यावर कुठल्याच पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, येथील सरपंच यांनी आजपर्यंत कोणतीच गाव विकासाच्या साठी ठोस उपाय योजना, दखल प्रयत्न केलेले नाहीत असे दिसून येत आहे गावात मध्ये नाल्या चे घाण पूर्णपणे तूटुंब भरली असून त्यामुळे पाणी मेन रोड वाहत येत आहे तरीही पण नाल्या साफसफाई करणे व ती घाण बाहेर नेऊन टकाने आजपर्यंत ग्रामपंचायतला जाग आलेला नाही , मुख्य रोडवर या सांडपाण्यामुळे कितीतरी विविध रोगांची जीवजंतू तयार झालेले आहेत साप, बेंडूक, मच्छर, डास यांचा सामना परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावेळी त्यांचे आरोग्य धोक्यात आहे.
गावात प्रत्येक वॉर्डात घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे श्री संत चतुर्भुज महाराज मंदिराच्या मागील बाजूस मुख्य रोडवर सांडपाणी रोडवर आलेले आहेत येथे गेल्या दहा वर्षापेक्षा जास्त पासून नाली बांधकाम केलेले नाही त्यामुळे या ठिकाणाला मोठे घाणीचे साम्राज्य डुकरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे मोठमोठे खड्डे पडले आहे या खड्ड्यात केव्हाही जीवित हानी नाकारता येत नाही श्री बुद्धेश्वर महाराज संस्थानमध्ये भाविकांना दर्शनासाठी व परिसरातील नागरिकांना येथील जे कचरा घाणीचे साम्राज्य बनले आहे त्याचा सामना त्यांना करावा लागत आहे श्री विठ्ठल रुक्माई मंदिराच्या मुख्य रोडवर गेल्या वर्षापासून नालीच्या शिखांचे बार वर आलेले आजही दिसून येत आहेत या ठिकाणी बोर्डी नदीवरील शिवाजीनगर मधील नागरिकांना गावात सुख सुविधेसाठी येण्या जाण्यास त्रास सहन करावा लागत आहे सावरा रोडवरील ग्रामपंचायत भवनाच्या भिंतीला लागून असलेले चिकन व मटन घर यामुळे मुख्य रोडवर घाणीचे साम्राज्य पसरलेले असून रोडच्या बाजूला सांडपाण्यामुळे भलेमोठे गटार तयार काटेरी झुडपे झालेले आहे या ठिकाणावरून वयोवृद्ध मंडळी व जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी मध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्यांचा जीव धोक्यात टाकून त्यांना जावे लागत आहे तरीही या कुंभकर्णी झोपाळू ग्रामपंचायत प्रशासनाला आज पर्यंत जाग का येत नाही नागरिकांच्या जीवनाशी खेळ का खेळत आहेत असे गावातील नागरिकांचे म्हणणे येत आहे,गावाच्या बाहेरील शेतात जाणारे मुख्य रस्ते सांडपाण्यामुळे पूर्णच्या पूर्ण खड्डेमय झालेले आहेत शेती उपयोगी लागणारे साहित्य बैलजोडी ट्रॅक्टर इत्यादी प्रकारचे वाहने यामधून नेण्यास खूप मोठी कसरत करत त्यांना जावे लागत आहे कितीकदा बैलजोडी या गटार यामध्ये पासून नुकसान झालेले आहे अशावेळी शेतकऱ्यांना या पद्धतीच्या सालामध्ये त्यांच्या बैलजोडी ना त्या गटारांमध्ये जीव धोक्यात टाकून त्यांना शेती कामे करावी लागत आहे यावेळी ग्रामपंचायत होनाला गावातील नाल्या मुख्य रस्ते यासाठी गावाची स्वच्छता रंगरंगोटी साठी लाखो रुपये निधी येऊन सुद्धा गावाचा विकास का भकास झालेला आहे गावातील ग्रामपंचायत नुसतं राजकारणा पुरतीच मर्यादित राहिलेली आहे गावात राजकीय वातावरणाने विकासाची कोणती दखल का मी विकास केलेली नाहीत गावाच्या विकासाचा खेळखंडोबा झालेला आहे विकासापासून कोसो दूर असलेले हे तालुक्यातील गटार मय गाव दिसून येत आहे.
अश्या वेळी गावातील शेतकरी व नागरिकांनी सामूहिक रित्या तक्रार तक्रारअकोला जिल्हाधिकारी, पंचायत समिती अकोट, सभापती, जिल्हा परिषद सदस्य ,व तहसीलदार अकोट तसेच आरोग्य विभागाला तक्रार दाखल केलेली आहे यावेळी यांना या गटाराच्या पासून मुक्तता किंवा गटारांमध्ये मुरूम टाकून रस्ता चांगला दुरुस्त करून मिळाला नाही तर उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे नागरिकांचे ग्रामपंचायतला इशारा आहे.
नंदकिशोर गोरडे, नागरीक : गावातील मुख्य रस्त्यावरील सांडपाण्याचे व नागरिकांचे दिवसेंदिवस पडण्याचे प्रमाण गड्ड्यामध्ये वाढत आहे या होणाऱ्या नुकसानाचे कोण जबाबदार आहे या ग्रामपंचायतचे करावे तरी काय ग्रामपंचायतला इशारा देत आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये जर का रस्ता दुरुस्त नाही झाला तर उग्र आंदोलन छेडणार आहे.
व्ही. एम. बनसोड . विस्तार अधिकारी व प्रशासक : गावाच्या मुख्य रस्त्यावर असलेले घाणीचे साम्राज्य ही खूप मोठी गंभीर बाब आहे तरी मी स्वतः येणाऱ्या तीन दिवसाच्या आत मध्ये ही व्यवस्था दुरुस्त करून देतो अशी मी नागरिकांनाही ग्वाही देतो .